Adhala Dam : आढळा धरण भरले; लाभक्षेत्रात आनंदाला उधाण

Adhala Dam : आढळा धरण भरले; लाभक्षेत्रात आनंदाला उधाण

0
Adhala Dam : आढळा धरण भरले; लाभक्षेत्रात आनंदाला उधाण
Adhala Dam : आढळा धरण भरले; लाभक्षेत्रात आनंदाला उधाण

Adhala Dam : अकोले: तालुक्यातील देवठाण येथील 1060 दशलक्ष घनफूट क्षमतेचे आढळा धरण (Adhala Dam) आज दुपारी 12 वाजता पूर्ण क्षमतेने भरले असल्याचे जलसंपदा विभागाने (Water Resources Department) जाहीर केले आहे. यामुळे लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. सध्या 60 क्यूसेकने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.

नक्की वाचा : ‘नारायण राणेंच्या नेपाळ्यासारख्या टिल्ल्या लेकाने नाक घासून माफी मागावी’- संजय राऊत

धरण भरल्याने शेतकरी आनंदी

आढळा धरण हे यंदा जुलैच्या पहिल्याच आठवड्यात भरल्याने शेतकरी आनंदी झाले आहेत. यामुळे रब्बी हंगाम व पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. या धरणाच्या लाभक्षेत्रात देवठाण, वीरगाव, हिवरगाव आंबरे, डोंगरगाव, पिंपळगाव निपाणी व गणोरे तसेच संगमनेर तालुक्यातील धांदरफळ, जवळे कडलग, पिंपळगाव कोंझिरा, वडगाव लांडगा, चिकणी, राजापूर, निमगाव भोजापूर व चिखली ही आठ गावे व सिन्नर तालुक्यातील चास, नळवाडी व कासारवाडी दोन गावे अशा या १६ गावांना शेतीसाठी सिंचनासाठी पाणी मिळते.

अवश्य वाचा : वाल्मिक कराडला करायची होती धनंजय मुंडेंच्या पीएची हत्या; विजयसिंह बांगर यांचा खुलासा

आढळा धरण भरणे परिसराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे (Adhala Dam)

याशिवाय पाच गाव पाणीपुरवठा योजना चालू आहे. त्यामुळे आढळा धरण भरणे परिसराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. सांडव्यावरून पाणी आढळा नदीत झेपावत असल्याने नदी प्रवाहित झाली आहे. लवकरच शासकीय जलपूजनाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती अकोलेचे उपविभागीय अभियंता योगेश जोर्वेकर यांनी दिली. तसेच गणोरेचे शाखा अभियंता महेश सूर्यवंशी, कालवा निरीक्षक मयूर देशमुख यांसह कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.