Adhala River : अकोले : आढळा पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर आषाढ सरींचे (Rain) तांडव सुरू असल्याने सांगवी लघु प्रकल्प ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे आढळा नदीचे (Adhala River) पाणी देवठाण येथील आढळा मध्यम प्रकल्पामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, या नदीवर सावरगाव पाटजवळ असलेल्या तवा धबधब्यावरून (Waterfall) पाणी कोसळू लागले आहे. हे अत्यंत नयनरम्य दृश्य पर्यटकांना (Tourists) खुणवू लागले आहे.
अवश्य वाचा: महसूल प्रशासनाकडून भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
चार-पाच दिवसांपासून परिसरात आषाढ सरी
अकोले तालुक्यातील आढळा परिसरात दरवर्षीच पावसाचे आगमन उशिरा होत असते. यावर्षी मात्र योग्यवेळी पावसाचे आगमन झाल्याने चार-पाच दिवसांपासून परिसरात आषाढ सरी कोसळत आहे. पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे आढळा मध्यम प्रकल्पावर असलेले सांगवी व पाडोशी लघु प्रकल्प नुकताच भरला आहे. देवठाण प्रकल्पामध्ये पाण्याची आवक सुरू झाली आहे. देवठाण मध्यम प्रकल्पाची क्षमता 1060 दशलक्ष घनफूट इतकी आहे. त्यापैकी गुरुवारी सकाळपर्यंत 625 इतका पाणीसाठा धरणात साठवला गेला होता.
नक्की वाचा: एलसीबी विरोधातील तक्रारींची १५ दिवसांत चौकशी; आश्वासनानंतर खासदार लंकेंचे उपोषण मागे
पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस (Adhala River)
पाडोशी लघु प्रकल्पाचे पाणी साठवण क्षमता 146 दशलक्ष घनफूट इतकी आहे, तर सांगवी लघु प्रकल्पाची 71 दशलक्ष घनफूट इतकी आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस बरसत असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान आढळा नदी वाहती झाल्याने सावरगाव पाट येथील तवा धबधबा फेसाळला आहे. अत्यंत वेगाने पाणी खाली कोसळत असून पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे धबधब्याचे नयनरम्य दृश्य पर्यटकांना आकर्षित करत आहे. दरम्यान दिवसभर पावसाच्या सरी बरसत असताना अनेक पर्यटकांनी धबधब्यावर जाऊन आनंद लुटला.