Adhalrao Patil:ठरलं तर मग!आढळराव पाटील करणार राष्ट्रवादीत प्रवेश

शिरुर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश आता निश्चित झाला आहे.

0
Adhalrao Patil
Adhalrao Patil

नगर : लोकसभा निवडणूकांचे (Loksabha Election) वारे राज्यात देखील जोमाने वाहन आहे. त्यातच आढळराव पाटील यांचं नाव देखील काही दिवसांपासून चर्चेत आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) प्रवेश आता निश्चित झाला आहे. २६ मार्चला आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. त्यामुळं आता शिरुरमध्ये पुन्हा एकदा यापूर्वीचे प्रतिस्पर्धी आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यातच थेट लढत होणार आहे.

नक्की वाचा : पाथर्डी तालुक्यात बनावट नोटांचा सुळसुळाट

आढळरावांच्या पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब (Adhalrao Patil)

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी आढळरावांच्या पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यांनी सांगितलं की, पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचा ही पक्ष प्रवेश लवकरच होणार आहे. तसेच शिवाजीराव आढळराव पाटील आणि काही पदाधिकाऱ्यांची आणि आमची बैठक झाली. २६ तारखेला संध्याकाळी आढळराव पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा करण्याचं पक्ष प्रवेश करण्याचे आम्ही निश्चित केलं असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अवश्य वाचा : ऋतुराजच्या नेतृत्वात चेन्नईची विजयी सलामी;आरसीबीला नमवले  

चौथी निवडणूक सगळ्या निवडणुकांचे रेकॉर्ड तोडतील-आढळराव पाटील (Adhalrao Patil)

आढळराव पाटील यावर म्हणाले, जी आकडेवारी आहे,त्यात माझ्याकडं काहीही नसताना मी पहिली निवडणूक ३० हजार मतांनी जिंकलो, दुसरी १ लाख ८० हजारांनी तर तिसरी निवडणूक ३ लाख ३० हजारांनी जिंकलो होतो. त्यानंतर आता चौथी निवडणूक सगळ्या निवडणुकांचे रेकॉर्ड तोडतील, अशी मला अपेक्षा आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here