Adhavwadi : आढाववाडी येथे श्री बिरोबा महाराजांची यात्रा उत्साहात साजरी

Adhavwadi : आढाववाडी येथे श्री बिरोबा महाराजांची यात्रा उत्साहात साजरी

0
Adhavwadi : आढाववाडी येथे श्री बिरोबा महाराजांची यात्रा उत्साहात साजरी
Adhavwadi : आढाववाडी येथे श्री बिरोबा महाराजांची यात्रा उत्साहात साजरी

Adhavwadi : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील आढाववाडी (Adhavwadi) या गावातील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांची वार्षिक यात्रा (Shri Biroba Maharaj Yatra Utsav) यंदा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त पहाटे प्रवरा संगम (Pravara Sangam) येथून कावडीद्वारे आणलेल्या गंगाजलाने श्री बिरोबा महाराज यांचा जलाभिषेक करण्यात आला. या धार्मिक विधीमुळे वातावरण भक्तिमय झाले होते.

नक्की वाचा : वादात असलेली जमीन खरातनेच विकत घेतली; संगमनेरमध्ये खळबळ

लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग

यात्रेदरम्यान फटाक्यांची आकर्षक आतषबाजी करण्यात आली, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून ग्रामस्थ व भाविकांचे मनोरंजन करण्यात आले. गावातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत यात्रेचा आनंद लुटला.

Adhavwadi : आढाववाडी येथे श्री बिरोबा महाराजांची यात्रा उत्साहात साजरी
Adhavwadi : आढाववाडी येथे श्री बिरोबा महाराजांची यात्रा उत्साहात साजरी

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण (Adhavwadi)

यात्रा कमिटीच्या वतीने संपूर्ण कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडलेल्या या यात्रेमुळे गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यात्रा कमिटीचे अंबादास आढाव, अंकुश घोरपडे, अजय आढाव, बाजीराव गवारे, भिमराज आढाव, अशोक घोरपडे, दत्ता साबळे, विजय आढाव, काशिनाथ साबळे, बापुसाहेब आढाव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.