Adinath Kothare:आदिनाथ कोठारे साकारणार डिटेक्टिवची भूमिका!

0
Adinath Kothare:आदिनाथ कोठारे साकारणार डिटेक्टिवची भूमिका!
Adinath Kothare:आदिनाथ कोठारे साकारणार डिटेक्टिवची भूमिका!

नगर : बॉलिवुडमध्ये मोठ्या प्रोजेक्ट्सचा भाग होत असताना सध्या अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) हा चांगला चर्चेत आहे. नुकतीच त्याने एक मोठी घोषणा करून रसिक प्रेक्षकांना खास सरप्राईज दिलं आहे. आदिनाथ लवकरच एका वेब सीरिजमधून (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच त्याचा प्रोमो (Promo Release) समोर आला आहे. या प्रोमोमधील आदिनाथचा लूक लक्षवेधी ठरतोय.

नक्की वाचा: दूध व्यवसाय ते सत्तेच्या शिखरापर्यंत; शिवाजीराव कर्डिलेंचा राजकीय प्रवास  
झी ५ मराठी ओरिजनल अंतर्गत लवकरच  प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या डिटेक्टिव धनंजय मध्ये तो एका डिटेक्टिवच्या भूमिकेत बघायला मिळाला आहे. सोबतीला आदिनाथ या नव्या वेब सीरिज साठी अभिनेता आणि निर्माता या दोन्ही भूमिका बजावताना दिसणार आहे.

अवश्य वाचा:  दरे गावात आलो की अनेकांना पोटदुखी,त्यांचा बंदोबस्त केलाय;एकनाथ शिंदेंचे विरोधकांना प्रत्युत्तर    

आदिनाथ कोठारेचे डिटेक्टिव स्किल्स वेबसिरीजमधून उलगडणार (Adinath Kothare)

मराठी इंडस्ट्री मधली दोन मोठ्या निर्मिती संस्था एकत्र येऊन “डिटेक्टिव धनंजय” या वेब सीरिजची निर्मिती करणार असून श्रीरंग गोडबोले यांची इंडियन मॅजिक आय आणि आदिनाथ कोठारेची स्टोरीटेलर्स नुक प्रायव्हेट लिमिटेड या दोन बड्या निर्मिती संस्थांच्या माध्यमातून याची निर्मिती होणार आहे. कादंबरीकार बाबूराव अर्नाळकर यांचं धनंजय हे पात्र या वेब शो मधून उलगडणार आहे. आदिनाथची करारी नजर आणि त्याचे डिटेक्टिव स्किल्स यातून उलगडणार का ? हे बघणं उत्सुकतेच असणार आहे.

आदिनाथ मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार  (Adinath Kothare)

एकीकडे अभिनेता म्हणून सुरू असलेला आदिनाथचा प्रवास तर दुहेरी भूमिका बजावत कायम उत्तम कलाकृतीची निर्मिती करून प्रेक्षकांना वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्स तो देत आहे. येणाऱ्या काळात देखील आदिनाथ रामायण, गांधी सारख्या अनेक बड्या बॉलिवूड प्रोजेक्ट्सचा मोठा भाग होणार आहे.