Adinath Maharaj Shastri : धक्कादायक! तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज यांनी स्वतःवरच केले वार…

Adinath Maharaj Shastri : धक्कादायक! तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज यांनी स्वतःवरच केले वार…

0
Adinath Maharaj Shastri : धक्कादायक! तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज यांनी स्वतःवरच केले वार…
Adinath Maharaj Shastri : धक्कादायक! तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज यांनी स्वतःवरच केले वार…

Adinath Maharaj Shastri : नगर : सध्या संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक घटना समोर आली आहे. तारकेश्वर गडाचे (Tarkeshwar Gad) महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी (Seriously Injured) झाले आहेत. आदिनाथ महाराज शास्त्री (Adinath Maharaj Shastri) यांनी स्वतःवरच वार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात आदिनाथ महाराज यांना दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळं त्यांच्या भक्तांमध्ये मोठी खळबळ उडालीय. नगरच्या पाथर्डी सह बीड जिल्ह्यात आदिनाथ महाराजांचा मोठा भक्त परिवार आहे.

नेमक प्रकरण काय? जाणून घ्या

तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांनी स्वत:वरच वार केले आहेत. यामध्ये ते स्वत: गंभीर जखमी झाले आहेत. महाराजांनी स्वत:वर वार नेमके का केले? याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु त्यांच्या अंगावर वार असल्याचे दिसताच त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अहिल्यानगर मधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समजते आहे.

महाराजांनी स्वतःवर वार का केले? (Adinath Maharaj Shastri)

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे तसेच भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी रुग्णालयात धाव घेत महाराजांची विचारपूस केली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, महाराजांनी स्वतःवर वार का केले? त्यामागे कोणताही वाद किंवा तणाव होता का? याबाबत विविध चर्चा सुरू असून याचा उलगडा पोलीस तपासानंतरच होणार आहे.