Aditi Tatkare on Ladki Bahin: लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये ‘त्या’ महिलांसाठी बदल; मंत्री आदिती तटकरेंची माहिती

0
Aditi Tatkare on Ladki Bahin: लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये 'त्या' महिलांसाठी बदल; मंत्री आदिती तटकरेंची माहिती
Aditi Tatkare on Ladki Bahin: लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये 'त्या' महिलांसाठी बदल; मंत्री आदिती तटकरेंची माहिती

Aditi Tatkare on Ladki Bahin : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा (Ladki Bahin Yojana) १६ वा हप्ता महिलांच्या खात्यावर लवकरच जमा केला जाणार आहे. मात्र त्याआधी लाडक्या बहिणींना ई- केवायसी(E-KYC) करावी लागणार असल्याचं राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare)यांनी स्पष्ट केलं आहे. मागील महिन्याभरापासून ई केवायसी करताना मोठ्या अडचणी येत होत्या. कधी सर्वर डाऊन होणे, तर कधी ओटीपी न येणे अशा समस्यांमुळे महिला मेटाकुटीला आल्या होत्या. यावरून मंत्री आदिती तटकरेंनी वेबसाईटमध्ये बदल (Website Changes) होत असल्यामुळे आणि ई केवायसीसाठी वेळ लागत असल्याचं सांगितलं आहे.

नक्की वाचा:  मुंबईत १५ कोटीच्या सोन्याची तस्करी;DRI च्या ‘ऑपरेशन बुलियन ब्लेझ’ अंतर्गत मोठी कारवाई

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता १० ऑक्टोबरपर्यंत जमा झाला होता. दिवाळीपूर्वी हा हप्ता जमा होण्याची अपेक्षा होती. मात्र गेल्या महिन्याभरापासून अनेकांना अडचणी येत होत्या. यावरून मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

काय म्हणाल्या आदिती तटकरे? (Aditi Tatkare on Ladki Bahin)

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या,” लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये काही बदल होत आहेत. त्यामुळे वेळ लागत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.ज्या महिलेचा पती आणि वडील नाही, अशा महिलांसाठी वेबसाईटवर बदल केले जाणार आहेत. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. कोणतीही महिला लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही.

ई केवायसी करण्याची मुदत काय ? (Aditi Tatkare on Ladki Bahin)

लाडक्या बहिणींचा १६ वा हप्ता जमा होण्यासाठी त्यांना ई केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ई-केवायसी शिवाय पुढील हप्ता त्यांच्या खात्यावर जमा होणार नाही, अशा सूचना आहेत. ई केवायसी करण्याची अंतिम तारीख १८ नोव्हेंबर २०२५ आहे.