Adivasi : आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान

Adivasi : आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान

0
Adivasi : आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान
Adivasi : आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान

Adivasi : अकोले : तालुक्याच्या आदिवासी (Adivasi) भागातील शेतकऱ्यांचे (Farmer) अतिवृष्टीने घरांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानींचे (Damage) पंचनामे करून तातडीने आदिवासी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई (Compensation) मिळावी, अशी मागणी या भागातील सामाजिक कार्यकर्ते अनंत घाणे, तुकाराम खाडे यांनी केली आहे.

नक्की वाचा: एलसीबी विरोधातील तक्रारींची १५ दिवसांत चौकशी; आश्वासनानंतर खासदार लंकेंचे उपोषण मागे

पूल वाहून गेल्याने वाडी-वस्तीच्या जनतेचे हाल

आदिवासी पट्ट्यातील रतनवाडी, घाटघर, पाचनई, अंबित, एकदरे, शेणित, देवगाव, पिंपरकणेसह सर्व भागांत तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस होऊन अतिवृष्टीमुळे नदीनाले पाण्याच्या पुरामुळे भरून वाहत आहेत. या पुरामुळे वारंघुशी, डावखांडी येथील रस्त्यावरील छोटे पूल वाहून गेल्याने वाडी-वस्तीच्या जनतेचे हाल झाले आहे. तर भात शेतीचे बांध फुटले आहे. मुतखेल, कोलटेंभे, रतनवाडी आदी गावांसह शिंगणवाडी, जहागिरदारवाडी, बारीसह भंडारदरा पाणलोटक्षेत्रातील मोठ्या प्रमाणात भातशेती, घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. .

अवश्य वाचा: महसूल प्रशासनाकडून भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

तातडीने पंचनामे करण्याचे आदेश (Adivasi)

याबाबत माजी आमदार वैभव पिचड यांना माहिती दिली असता त्यांच्यावतीने तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, तालुका कृषी अधिकारी अशोक साळी, गटविकास अधिकारी विकास चौरे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून झालेल्या नुकसानींचे पंचनामे तातडीने करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनंत घाणे, तुकाराम खाडे, उन्नती सेवा मंडळाचे अध्यक्ष भरत घाणे, अशोक भोजणे, तुकाराम सारूक्ते, मच्छिंद्र खाडे, सुभाष बांडे, बाजीराव सगभोर, रामदास पिचड, सागर रोंगटे, पांडुरंग पद्मेरे, दीपक भागडे आदिंसह शेतकऱ्यांनी केली आहे. त्यावरुन तहसीलदार डॉ. मोरे यांनी सर्व खात्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here