Adivasi : राजूरमध्ये राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलन उत्साहात

Adivasi : राजूरमध्ये राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलन उत्साहात

0
Adivasi : राजूरमध्ये राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलन उत्साहात
Adivasi : राजूरमध्ये राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलन उत्साहात

Tribal Literary Conference : अकोले : प्रगतिशील लेखक संघ आणि आदिवासी (Adivasi) समाज बांधवांद्वारा पहिले राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलन (Tribal Literary Conference) राजूर (ता.अकोले) येथील अ‍ॅड. एम. एन. देशमुख महाविद्यालयात उत्साहात पार पडले.एकदिवसीय साहित्य संमेलनात परिसरातून मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी उपस्थित होते.

नक्की वाचा : अमेरिकेत आता तृतीयपंथींना मान्यता नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय

अनेक आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषेमध्ये उपस्थित

यावेळी ग्रंथदिंडी काढण्यात आली, त्यामध्ये युवक-युवती आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. अनेक आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषेमध्ये या संमेलनासाठी उपस्थित होते. संमेलनाचे अध्यक्षस्थान राकेश वानखेडे यांनी भूषविले तर उद्घाटन भोराबाई गांगड, संजय दाभाडे यांनी केले. स्वागताध्यक्षपदी आयुक्त वसंत पिचड हे होते.   अध्यक्षीय मनोगतातून कादंबरीकार राकेश वानखेडे म्हणाले, मराठी साहित्यातील प्रचलित प्रवाहांपैकी लिटिल मॅगझिनची चळवळ असो, ग्रामीण साहित्य असो किंवा देशीवादी-ब्राह्मणी-स्त्रीवादी साहित्य हे सारे प्रवाह आदिवासी साहित्यासाठी आदर्श असू शकत नाहीत. तसेच आदिवासी साहित्य, संकल्पना, व्याप्ती, स्वरूप, व्याख्या, आदिवासी साहित्य समोरील आव्हाने यासंबंधी आपल्या विवेचनातून विचारमंथन केले.

अवश्य वाचा : नवा जुना वाद मिटवून पक्षाचे काम करा: डाॅ. सुजय विखे पाटील

आदिवासी साहित्य या विषयावर महत्त्वाचा परिसंवाद (Adivasi)

दुसर्‍या सत्रामध्ये आदिवासी साहित्य व साहित्याची लक्षणे या विषयावर महत्त्वाचा परिसंवाद झाला. पुणे विद्यापीठाचे डॉ. तुकाराम रोंगटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या महत्त्वपूर्ण परिसंवादात प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, साहित्यिक संजय दोबाडे, राजू ठोकळ, सतीश लेंभे, अभ्यासक रवी बुधर यांनी महत्त्वपूर्ण विषयाची मांडणी केली. काव्य स्पर्धेत विजयी ठरलेल्या कवीला काव्य महाकरंडक अध्यक्षांच्या हस्ते बहाल करण्यात आला. आदिवासी समाजात सामाजिक, सांस्कृतिक आणि सृजनशील काम करणारे बांधव प्रा. नितीन तळपाडे, विशाल पोटिंदे, सखाराम गांगड, कवीराज बोटे, जगन्नाथ सावळे, जयेश पाटेकर, जालिंदर आडे, जयंत पटेकर यांना आदिवासी समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दुपारच्या सत्रात आमदार डॉ. किरण लहामटे, आदिवासी साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष सुनील गायकवाड, दुपार सत्राचे अध्यक्ष दिगंबर नवाळी यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. यावेळी उद्योजक सुरेश कोते, मधुकर तळपाडे, प्राचार्य बी. वाय. देशमुख उपस्थित होते. सूत्रसंचालन दशरथ भोये यांनी केले. प्रास्ताविक कवी तान्हाजी सावळे यांनी केले.