Adulterated Milk : भेसळयुक्त दूध आढळल्यास संबंधितांवर कारवाई करा; मंत्री विखे पाटलांचे निर्देश

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध आढळल्यास संबंधितांवर कारवाई करा; मंत्री विखे पाटलांचे निर्देश

0
Adulterated Milk : भेसळयुक्त दूध आढळल्यास संबंधितांवर कारवाई करा; मंत्री विखे पाटलांचे निर्देश
Adulterated Milk : भेसळयुक्त दूध आढळल्यास संबंधितांवर कारवाई करा; मंत्री विखे पाटलांचे निर्देश

Adulterated Milk : नगर : समाजातील प्रत्येकाला उच्चप्रतीचे दूध मिळावे, याला शासनाचे (Government) प्राधान्य आहे. जिल्ह्यात दूध संकलित करण्यात येणाऱ्या दूध संकलन (Milk collection) केंद्राची संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी करावी. भेसळयुक्त दूध (Adulterated milk) आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करा, असे निर्देश पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिले.

नक्की वाचा: रिव्हॉल्वरचा धाक दाखवून ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण करणारे आरोपी जेरबंद

दूध भेसळ समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन (Adulterated Milk)

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय दूध भेसळ समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले आदी उपस्थित हाेते.

अवश्य वाचा: संत सदगुरु गोदड महाराजांचा रथोत्सव उत्साहात साजरा

मंत्री विखे पाटील म्हणाले (Adulterated Milk)

”जिल्ह्यातील प्रत्येक दूध संकलन केंद्रावर दूधसंकलन केंद्रावर दूध देणाऱ्या शेतकऱ्यांना ३० रुपये प्रतीलिटर दर देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. जे केंद्र शेतकऱ्यांना ३० रुपयांचा दर देणार नाहीत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here