AFG vs BAN:अफगाणिस्तानने रचला इतिहास,बांगलादेशला घरचा रस्ता दाखवत केला सेमीफायनलमध्ये प्रवेश

ट्वेन्टी ट्वेन्टीच्या विश्वचषकात (T20 World Cup 2024) अफगाणिस्तानने (Afghanistan) आज नवा इतिहास घडवला. अफगाणिस्तानने अखेरच्या सुपर एट सामन्यात बांगलादेशचा (Bangladesh) पराभव करून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली.

0
AFG vs BAN: अफगाणिस्तानने रचला इतिहास,बांगलादेशला घरचा रस्ता दाखवत केला सेमी फायनलमध्ये प्रवेश
AFG vs BAN: अफगाणिस्तानने रचला इतिहास,बांगलादेशला घरचा रस्ता दाखवत केला सेमी फायनलमध्ये प्रवेश

नगर : ट्वेन्टी ट्वेन्टीच्या विश्वचषकात (T20 World Cup 2024) अफगाणिस्तानने (Afghanistan) आज नवा इतिहास घडवला. अफगाणिस्तानने अखेरच्या सुपर एट सामन्यात बांगलादेशचा (Bangladesh) पराभव करून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. या सामन्यात अफगाणिस्तानला २० षटकात ५ बाद ११५ धावांचीच मजल मारता आली होती. पण पावसाच्या व्यत्ययामुळं बांगलादेशसमोर विजयासाठी १९ षटकात ११४ धावांचं आव्हान होतं.

नक्की वाचा : गुडन्यूज! जूनमधील मान्सून आता जुलैमध्ये बरसणार

अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये (AFG vs BAN)

अफगाणिस्ताननं बांगलादेशला १८व्या षटकांत १०५ धावांत रोखलं. या विजयासह अफगाणिस्ताननं भारतापाठोपाठ पहिल्या गटातून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. त्यामुळं ऑस्ट्रेलियाचं आव्हान सुपर एट मध्येच संपुष्टात आले आहे. सेंट विंसेंटच्या अर्नोस वेले ग्राऊंड वर सुरु असलेली अफगाणिस्तान आणि बांग्लादेश यांच्यातील मॅच सुपर ८ मधील अखेरची मॅच आहे. या मॅचच्या निकालावर ग्रुप १ मधून सेमीफायनलमध्ये कोण जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्याचेच उत्तर आता सगळ्यांना मिळाले आहे.

बांगलादेशनं प्रथम गोलंदाजी करत अफगाणिस्तानला ११५ धावांवर रोखलं होतं. यानंतर या मॅचमध्ये वारंवार पावसाचा व्यत्यय येत होता.अफगाणिस्तानच्या गोलंदाजीनं पुन्हा एकदा कमी धावसंख्येची मॅच जिंकण्यासाठी जोरदार कामगिरी केली.अफगाणिस्तानकडून नवीन उल हकनं बांगलादेशच्या चार विकेट घेतल्या. फाझल हक फारुकीनं एक विकेट घेतली. अफगाणिस्तानचा कॅप्टन राशिद खाननं चार विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार कामगिरी करणाऱ्या गलबदीन नैबनं एक विकेट घेतली. बांगलादेशकडून लिटन दासनं ५४ धावा केल्या. त्याला इतर फलंदाजांनी साथ दिली नाही. सौम्या सरकारनं १० तर तोहिद हरिदोयनं १४ धावा केल्या. अफगाणच्या गोलंदाजीपुढं बांगलादेशचे इतर फलंदाज टिकाव धरु शकले नाहीत.

अवश्य वाचा : ‘मनोज जरांगेंचा अभ्यास कमी,मुस्लिम समाजाला २५ वर्षांपूर्वीच ओबीसीतून आरक्षण’- छगन भूजबळ   

अफगाणिस्तानचा मोठा पराक्रम (AFG vs BAN)

अफगाणिस्ताननं सुपर ८ मध्ये प्रथम ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. त्यानंतर आज बांगलादेशला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. प्रथम रहमानुल्लाह गुरबाजनं ४३ धावा केल्या. यानंतर राशिद खान आणि नवीन-उल-हक या दोघांनी प्रत्येकी चार विकेट घेत संघाला विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानच्या विजयामुळं ऑस्ट्रेलियाचं टी २० वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं. सुपर ८ च्या ग्रुप १ मधून भारत, अफगाणिस्तान आणि ग्रुप २ मधून दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड सेमी फायनलमध्ये पोहोचले आहेत. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत आमने सामने येतील. दुसरीकडे भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here