Afghanistan Vs South Africa : थरार… डबल Super over मध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा करेक्ट ‘गेम’ केला

Afghanistan Vs South Africa : थरार… डबल Super over मध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा करेक्ट 'गेम' केला

0

Afghanistan Vs South Africa : नगर : आफ्रिकेच्या १८७ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने (Afghanistan) शेवटच्या षटकापर्यंत मॅच नेली. पण, विजयी धाव घेताना फझलहक फारूकी रन आऊट झाला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये (Super Over) गेला. कागिसो रबाडासारख्या अनुभवी गोलंदाजाने २०व्या षटकात दोन नो बॉल व एक व्हाईड बॉल (Wide Ball) टाकून अफगाणिस्तानला मॅच आणून दिली होती. पण, शेवटी एक धाव कमी पडली. सुपर ओव्हरमध्ये आफ्रिकेच्या त्रिस्तान स्तब्सने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून सामना बरोबरीत आणला आणि दुसरा सुपर ओव्हरचा सामना रंगला. आणि दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये  दक्षिण आफ्रिकेने (South Africa) अफगाणिस्तानचा करेक्ट ‘गेम’ केला.

अवश्य वाचा : पाथर्डी पंचायत समितीत घाणीचे साम्राज्य; प्रशासनाचे दुर्लक्ष

Afghanistan Vs South Africa : थरार… डबल Super over मध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा करेक्ट 'गेम' केला
Afghanistan Vs South Africa : थरार… डबल Super over मध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा करेक्ट ‘गेम’ केला

अफगाणिस्तान १८७ धावांवर ऑल आऊट

फॉर्मात असलेल्या एडन मार्करमनला ( ५) स्वस्तात माघारी पाठवल्यानंतर अफगाणिस्तानी आनंदात होती. पण, क्विंटन डी कॉक व रायन रिकेल्टनच्या ११२ धावांच्या भागीदारीने सामना आफ्रिकेच्या बाजूने फिरवला. राशिद खानने १३ व्या षटकात मॅच पुन्हा अफगाणिस्तानच्या बाजूने झुकवली. त्याने दोन्ही सेट फलंदाजांना एकाच षटकात बाद केले. क्विंटनने ४१ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारासह ५९ धावांवर, तर रिकल्टन २८ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ६१ धावांवर बाद झाला. डेव्हॉल्ड ब्रेव्हिस ( २३), मार्को यान्सने ( १६) व डेव्हिड मिलर ( २० ) यांच्या योगदानाच्या जोरावर आफ्रिका ६ बाद १८७ धावांपर्यंत पोहोचले. अझमतुल्लाह ओमारझाईने ३, तर राशिदने दोन विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने ५२ धावांवर ३ विकेट्स गमावल्या. सलामीवीर रममनुल्लाह गुरबाझ मैदानावर उभा राहिला आणि त्याने ४२ चेंडूंत ४ चौकार व ७ षटकारांसह ८४ धावांची दमदार खेळी केली. अझमतुल्लाह ( २२) व राशिद ( २०) यांनी चांगले योगदान दिले.शेवटच्या षटकात विजयासाठी १३ धावा हव्या असताना कागिसो रबाडाने नो बॉल व व्हाईड बॉल फेकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर नूर अहमदने षटकार खेचून सामना ४ चेंडूंत ५ धावा असा जवळ आणला. चौथ्या चेंडूवर नो बॉल पडला अन् दोन धावा मिळाल्या. २ चेंडू ३ धावा असा सामना जवळ आला. चौथ्या चेंडूवर दुसरी धाव घेताना फझलहक फारूकी रन आऊट झाला आणि अफगाणिस्तान १८७ धावांवर ऑल आऊट झाला.  

नक्की वाचा : कॉपी मुक्त परीक्षेच्या केवळ घोषणाच; अहिल्यानगरमध्ये आढळले ९ कॉपी बहाद्दर

Afghanistan Vs South Africa : थरार… डबल Super over मध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा करेक्ट 'गेम' केला
Afghanistan Vs South Africa : थरार… डबल Super over मध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा करेक्ट ‘गेम’ केला

सुपर ओव्हरचा थरार (Afghanistan Vs South Africa)

अझमतुल्ला ओमारझाईने पहिल्या दोन चेंडूवर ४ व ६ खेचला. पुढील दोन चेंडूंवर एकेक धाव आली. त्यानंतर चौकार व एक धाव घेताना अफगाणिस्तानने १७ धावा फलकावर चढवल्या. आफ्रिकेला ६ चेंडूंत १८ धावा करायच्या होत्या. डेव्हिड मिलर आणि डेव्हॉल्ड ब्रेव्हिस ही जोडी मैदानावर आली… मिलरने पहिला फुलटॉस चेंडू मिस केला आणि एक धाव मिळाली. ब्रेव्हिसने दुसरा चेंडू पुल शॉटवर सीमापार पाठवला. तिसऱ्या चेंडूवर फझलहक फारूकी स्लोव्हर बाऊन्सर फेकला अन् ब्रेव्हिस पुल शॉट मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला.आफ्रिकेला ३ चेंडूंत ११ धावा करायच्या होत्या. त्रिस्तान स्तब्सने चौकार खेचला, परंतु पुढचा चेंडू निर्धाव राहिला. १ चेंडू ७ धावा असा सामना आलेला असताना स्तब्सने षटकार खेचला आणि सामना दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गेला.

हे पहा : अंगणवाडीच्या आहारात भेसळ; गोदामावर पोलिसांचा छापा

Afghanistan Vs South Africa : थरार… डबल Super over मध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा करेक्ट 'गेम' केला
Afghanistan Vs South Africa : थरार… डबल Super over मध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा करेक्ट ‘गेम’ केला

दुसरी सुपर ओव्हर

अझमतुल्लाह ओमारझाईचा पहिलाच चेंडू त्रिस्तान स्तब्सने षटकार खेचला, नंतर एक धाव काढून डेव्हिड मिलरला स्ट्राईक दिली. मिलरने तिसऱ्या चेंडूवर दोन धावा काढल्या. त्यानंतर मिलरने सलग दोन षटकार मारले. शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेत आफ्रिकने २४ धावांचे लक्ष्य ठेवले. मिरलने ४ चेंडूत १६ धावा, तर स्तब्सने २ चेंडूत ७ धावा केल्या. कर्णधार एडन मार्करमने चेंडू केशव महाराजच्या हाती दिला.  पहिला चेंडू निर्धाव टाकला आणि दुसऱ्याच चेंडूवर मोहम्मद नबीला झेलबाद केले.  अफगाणिस्तानला ४ चेंडूत २४ धावा  हव्या होत्या. रहमनुल्लाह गुरबाजने सलग तीन चेंडू सीमापार पाठवून अफगाणिस्तानला सामन्यात जिवंत  ठेवले होते. महाराजने शेवटचा चेंडू व्हाईड टाकून आणखी एका सुपर ओव्हरची संधी निर्माण केली होती, परंतु सहाव्या चेंडूवर विकेट घेऊन दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला