Agasti Cooperative Sugar Factory : अगस्ती कारखाना उसाला प्रतिटन तीन हजार रुपये भाव देणार: गायकर

Agasti Cooperative Sugar Factory : अगस्ती कारखाना उसाला प्रतिटन तीन हजार रुपये भाव देणार: गायकर

0
Agasti Cooperative Sugar Factory : अगस्ती कारखाना उसाला प्रतिटन तीन हजार रुपये भाव देणार: गायकर
Agasti Cooperative Sugar Factory : अगस्ती कारखाना उसाला प्रतिटन तीन हजार रुपये भाव देणार: गायकर

Agasti Cooperative Sugar Factory : अकोले : अगस्ती सहकारी साखर कारखाना (Agasti Cooperative Sugar Factory) यावर्षी साडेतीन लाख टन उसाचे (Sugarcane) गाळप करणार आहे. 2025-26 च्या गळीत हंगामासाठी उसाला प्रतिटन तीन हजार रुपये भाव देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर (Sitaram Gaikar) यांनी केली.

नक्की वाचा : आमदार संग्राम जगताप झाले संतप्त; स्वच्छता निरीक्षकांची घेतली झाडाझडती

कारखान्याचा ३२ वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ

कारखान्याचा ३२ वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ व गळीत हंगामाचा प्रारंभ गुरुवारी (ता.३०) आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते करण्यात आला. योगी केशवबाबा, प्रकाश मालुंजकर, गुलाबराव शेवाळे, बाळासाहेब ताजणे, भाऊसाहेब ताजणे, अमृतसागरचे संचालक  आनंदराव आवारी, बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे, उपसभापती रोहिदास भोर, संचालक ईश्‍वर  वाकचौरे, विठ्ठल कुमकर, राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष अक्षय आभाळे, हरिभाऊ फापाळे, कैलास नवले, मनसेचे तालुकाप्रमुख दत्ता नवले, संचालक मंडळ, मुख्य लेखापाल विजय सावंत, मुख्य अभियंता दिलीप नाईकवाडी, कार्यालयीन अधीक्षक विश्‍वास ढगे आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा: युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार

कारखाना कोणत्याही स्थितीत बंद पडू देणार नाही (Agasti Cooperative Sugar Factory)

कारखाना जोपर्यंत आमच्या संचालक मंडळाच्या ताब्यात आहे तोपर्यंत कोणत्याही स्थितीत बंद पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही आमदार लहामटे यांनी यावेळी दिली. यावर्षीचा गळीत हंगाम हा ३२ वर्षातील सर्वात अडचणीचा आहे. हंगाम सुरू करण्यासाठी चाळीस कोटी रुपयांची गरज होती. बँकेकडून फक्त बारा कोटी रुपये मिळाले. मात्र तालुक्यातील संस्था, कारखान्याशी संबंधित व्यापारी यांच्याकडून मदत मिळाली असे सांगून हा गळीत हंगाम निर्विघ्नपणे पार पडेल अशी ग्वाही गायकर यांनी दिली. गळितासाठी तालुक्यात दीड-पावणे दोन लाख टन ऊस उपलब्ध आहे.

कारखाना यावर्षी तीन हजार रुपये देणार (Agasti Cooperative Sugar Factory)

साखर कारखानदारीत स्पर्धा वाढली आहे. अनेक कारखान्यांनी आपली गाळप क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविली आहे. त्यांच्याशी स्पर्धा करायची तर तालुक्यात चार साडेचार लाख टन ऊस निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्याने गतवर्षी 2 हजार 800 रुपये भाव दिला होता. यावर्षी तीन हजार रुपये देणार असल्याचे त्यांनी सांगितले. गतवर्षी कारखान्याला केंद्राकडून 94 कोटी रुपयांचे कर्ज मिळाले. कर्ज मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. कारखाना बंद पडायची ते वाट पाहत होते, अशांकडे दुर्लक्ष करा असा सल्ला देत कारखाना बंद पडू दिला जाणार नाही, असे आमदार लहामटे यांनी ठामपणे सांगितले. प्रास्ताविक व स्वागत ज्येष्ठ संचालक पर्बत नाईकवाडी यांनी केले. सूत्रसंचालन कामगार अधिकारी नामदेव शेटे यांनी केले तर आभार संचालक मनोज देशमुख यांनी मानले.