Agasti Education Society : अकोले: श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटीचे (Agasti Education Society) महात्मा फुले विद्यालय सुगाव बुद्रुक (ता.अकोले) विद्यालयाने युवा व क्रीडा सेवा संचालनालय (Directorate of Sports And Youth Services) अहिल्यानगर यांच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत (Sports Competition) चमकदार कामगिरी दाखवत वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारात यश मिळवून दिले.
अवश्य वाचा: ११ बालकांच्या मृत्यूमुळे कफ सिरपच्या वापराबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ॲडव्हायजरी केली जारी
विभागीय पातळीवर विविध स्पर्धांचे आयोजन
शासनाच्यावतीने दरवर्षी तालुकास्तर, जिल्हास्तर, राज्यस्तर आणि विभागीय पातळीवर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही तालुका स्तरावर क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत महात्मा फुले विद्यालयाने फुटबॉल 17 वर्षे वयोगट मुले प्रथम, 17 वर्षे वयोगट मुली द्वितीय, 14 वर्षे वयोगट मुली द्वितीय तर व्हॉलीबॉल 17 वर्षे वयोगट मुली द्वितीय व मुले तृतीय, 14 वर्षे वयोगट मुले व मुली द्वितीय क्रमांक पटकावला.
नक्की वाचा : निलेश घायवळचा आणखी एक प्रताप समोर; दोन जिल्ह्यात काढली ओळखपत्र
संस्थेने नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन (Agasti Education Society)
रिंग टेनिस या क्रीडा प्रकारात मुलींचा जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक व बुद्धिबळ स्पर्धेत आराध्या चौधरी हिने तालुकास्तरावर चतुर्थ क्रमांक मिळवत जिल्हा स्तरावर निवडीस पात्र ठरली. अॅथलेटिक्स उंचउडी स्पर्धेत अलिना पठाण हिने तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला. रिंग टेनिस स्पर्धेत राज्य पातळीवर नांदेड येथे विद्यालयाचा ओम शिवदास देशमुख याने चतुर्थ क्रमांक पटकावत राज्य पातळीवर विद्यालयाला बहुमान मिळवून दिला. यश मंगेश देशमुख याने राज्य स्तरावर सहभाग नोंदवला. तर रिंग टेनिस राज्य पातळीवर निवड चाचणीसाठी श्रावणी महेंद्र देशमुख, खुशी रमेश आवारी यांची निवड झाली आहे. संस्थेने वेळोवेळी क्रीडा साहित्य उपलब्ध करून देऊन नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आहे व याकामी क्रीडा शिक्षक दत्तात्रेय घुले यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.