Agniveer Yojana:माजी अग्निविरांना दिलासा;सशस्त्र दलात अग्निविरांसाठी १० टक्के पदे राखीव 

केंद्रीय गृहमंत्रालकडून मिळालेल्या माहितीनुसार आता सीआयएसएफ, बीएसएफ, सीआरपीएफ आणि आरपीएफ सारख्या सशस्त्र दलात माजी अग्निवीर जवानांसाठी १० टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत.

0
Agniveer Yojana: माजी अग्निविरांना दिलासा;सशस्त्र दलात अग्निविरांसाठी १० टक्के पदे राखीव 
Agniveer Yojana: माजी अग्निविरांना दिलासा;सशस्त्र दलात अग्निविरांसाठी १० टक्के पदे राखीव 

नगर : अग्निवीर योजना जाहीर केल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. आता याचे पडसाद लोकसभेत देखील बघायला मिळाले आहेत. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने माजी अग्निवीर जवानांसाठी (Agniveer Jawan) मोठी घोषणा केली आहे. माजी अग्निवीर जवानांसाठी केंद्रीय सशस्त्र दलात (central armed forces) १० टक्के पदे राखीव ठेवली जातील, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलं आहे.

नक्की वाचा : निवृत्तीनाथ महाराज पालखी रथावर भंडाऱ्याची उधळण

सशस्त्र दलात माजी अग्निवीर जवानांसाठी १० टक्के राखीव जागा (Agniveer Yojana)

केंद्रीय गृहमंत्रालकडून मिळालेल्या माहितीनुसार आता सीआयएसएफ, बीएसएफ, सीआरपीएफ आणि आरपीएफ सारख्या सशस्त्र दलात माजी अग्निवीर जवानांसाठी १० टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. तसेच त्यांना शारीरिक चाचणीत देखील शिथीलता देण्यात येईल. याशिवाय त्यांना वयोमर्यादेत सुद्धा सूट मिळणार आहे. पहिल्या तुकडीसाठी पाच वर्ष तर पुढच्या तुकड्यांसाठी तीन वर्षांची सुट मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

यासंदर्भात बोलताना, सीआरपीएफचे महासंचालक अनिश दयाल म्हणाले, सीआरपीएफमध्ये माजी अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व व्यवस्था झाली आहे. माजी अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट दिली जाणार आहे. तसेच त्यांनी शारीरिक चाचणीत देखील सूट दिली जाणार आहे. याशिवाय सीआयएसएफनेही यासंदर्भात सर्व तयारी केली असल्याची माहिती सीआयएसएफच्या महासंचालक नीना सिंह यांनी दिली आहे.

अवश्य वाचा : आमदार रोहित पवार यांचे उपोषण मागे

अग्निवीर योजना काय आहे ? (Agniveer Yojana)

भारतीय सैन्यदलांत १७.५ ते २१ वर्षे या वयोगटातील तरुणांना अग्निवीर म्हणून सेवेची संधी दिली जाते. चार वर्षांच्या कालावधीसाठी त्यांना समाविष्ट केले जाते. तसेच त्यांना महिन्याला ३० ते ४० हजार रुपये वेतन दिले जाते. प्रत्येक अग्निवीरास मासिक वेतनातील ३० टक्के रक्कम अग्निवीर समूह निधीत द्यावी लागते. यातून कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवा निधी अंतर्गत ११.७१ लाख रुपये दिले जातात. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना कामगिरीच्या आधारे स्थायी सेवेत दाखल केले जाते. प्रत्येक तुकडीतील २५ टक्के अग्निवीरांना या पद्धतीने स्थायी सेवेत स्थान देण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here