Agricultural Exhibition : राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास चार दिवसांत एक लाख शेतकऱ्यांची भेट

Agricultural Exhibition : राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास चार दिवसांत एक लाख शेतकऱ्यांची भेट

0
Agricultural Exhibition : राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास चार दिवसांत एक लाख शेतकऱ्यांची भेट
Agricultural Exhibition : राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास चार दिवसांत एक लाख शेतकऱ्यांची भेट

Agricultural Exhibition : कर्जत : सदगुरु ग्रामविकास प्रतिष्ठान (Sadhguru Gram Vikas Pratishthan) आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) यांच्या संयुक्त विद्यमाने भरलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास (Agricultural Exhibition) सर्वसामान्य शेतकऱ्यांसह कर्जतकरांनी भरघोस प्रतिसाद देत तब्बल एक लाख लोकांनी भेट दिली. सोमवारी (ता.३) या राज्यस्तरीय प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून कर्जतचा आठवडे बाजार असल्याने गर्दीचा उच्चांक होईल, अशी माहिती आयोजक बंडू पाचपुते आणि गणेश जठार यांनी दिली.

Agricultural Exhibition : राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास चार दिवसांत एक लाख शेतकऱ्यांची भेट
Agricultural Exhibition : राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास चार दिवसांत एक लाख शेतकऱ्यांची भेट

नक्की वाचा : …म्हणून मला टोकाचा निर्णय घ्यावा लागला’;शिवराज राक्षेचं वक्तव्य

खासदार निलेश लंकेंच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन

कर्जत शहरातील फाळके पेट्रोल पंपाच्या प्रांगणात ३० जानेवारीपासून पाच दिवशीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार निलेश लंकेंच्या हस्ते झाले होते. तर शुक्रवारी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेंनी भेट देत या नूतन उपक्रमाचे कौतुक केले होते. चार दिवसांत कर्जतसह करमाळा, श्रीगोंदा, जामखेड तालुक्यातील जवळपास एक लाख शेतकऱ्यांनी विविध स्टॉलला भेट देत नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतली. यासह कृषी अवजारे, ट्रॅक्टर्स, ठिबकसिंचन, सोलर, शेततळी कागद, पशूआहार, दुधकाढणी यंत्रे याबाबत माहिती घेत एकाच छताखाली सर्व उपलब्ध केल्याने समाधान व्यक्त केले. या भरघोस प्रतिसादामुळे प्रदर्शनात सहभागी झालेले स्टॉलधारकांचा उत्साह देखील वाढला. तसेच घरगुती साहित्य खरेदीसाठी महिलावर्गांची देखील या प्रदर्शनात मोठी गर्दी पहावयास मिळाली.

अवश्य वाचा : सत्यजित तांबे यांना आदर्श युवा आमदार पुरस्कार प्रदान

सोमवारी कृषी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस (Agricultural Exhibition)

सोमवारी कृषी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून कर्जतचा आठवडे बाजार असल्याने जास्तीत जास्त शेतकरी बांधव आणि महिलांनी या कृषीप्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सदगुरु ग्राम विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तात्या फाळके आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांच्यासह पीजेएम व्यवस्थापन पाचपुते आणि जठार यांनी केले.या प्रदर्शनात मंगसुळी (जिल्हा – बेळगाव) येथील विलास नाईक यांचा हिंदकेसरी गजेंद्र रेडा या सर्वाचे लक्ष वेधत आहे. प्रदर्शनास भेट देण्यासाठी आलेले हौशी पशुपालक यासह शेतकरी कुटुंब या रेडा जोडी बरोबर फोटो घेत ते सोशल मीडियावर ठेवत आहेत.