Ahilyabai Holkar : अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त नगरमध्ये शोभायात्रेचे आयोजन

0
Ahilyabai Holkar
Ahilyabai Holkar

Ahilyabai Holkar : नगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyabai Holkar) यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त नगरमध्ये २ शोभायात्रा काढण्यात येणार आहेत. यामध्ये पहिली सकाळी ७ ते ९ यावेळेत श्रीराम चौक चौक येथून निघून पाईपलाईन रस्ता, भिस्तबाग चौक, कुष्ठधाम रस्ता, प्रोफेसर कॉलनी चौक येथे पर्यंत त्यानंतर दुसरी शोभा यात्रा सकाळी ९.३० ते ११.३० पर्यंत होणार आहे. ती हुतात्मा करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथून सुरु होऊन दिल्ली गेट, चितळे रस्ता, नवी पेठ, घुमरे गल्ली, पंचपीर चावडी, माळीवाडा, मार्केट यार्ड चौक, छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा येथे सांगता होणार आहे, यामध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) लोककलावंत, धनगरी ढोलपथक, आदिवासी होळी नृत्य, आदिवासी कांबड नृत्य, आदिवासी गौरी नृत्य, आदिवासी टिपरी नृत्य, आदिवासी फुगडी नृत्य आदी प्रकार कलाकार सादर करणार आहेत.

हे देखील वाचा: मुलगी दिली नाही म्हणून मौलनानेच मुलीच्या बापाचा केला खून

राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा

राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक फेरी झाली. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. डॉ. भरत होळकर व प्रा.डॉ. नवनाथ वाव्हाळ यांनी काम पाहिले. त्याची अंतिम फेरी शुक्रवारी (ता. ३१) बालिकाश्रम रस्त्यावरील मास्टर माईंड अॅकॅडमी येथे सकाळी १०.३० वाजता होत आहे. यामध्ये निवड झालेले स्पर्धक खालील प्रमाणे अक्षता वडवणीकर, शिवगंगा मत्रे, आकाश मोहिते, महेश उशीर, सुनील कात्रे, दीपिका चोरमले, गोविंद गोचडे, आकाश बोडखे, देवकी ढोकणे, प्रा.शंकर गवते, प्रा. दीपक परदेशी, तेजश्री पंडित, संस्कृती वनवे वरील स्पर्धाकांची निवड झाली.

नक्की वाचा : ‘चित्रपटानंतर गांधींना ओळख मिळाली त्यापूर्वी त्यांना कोणीही ओळखत नव्हतं’- मोदी

सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन (Ahilyabai Holkar)

सर्वांनी शोभायात्रेस व वक्तृत्व स्पर्धेस उपस्थित राहावे, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक महोत्सवचे कार्याध्यक्ष माजी महापौर बाबासाहेब वाकळे, विचार भारती अध्यक्ष अरुण कुलकर्णी, सांस्कृतिक महोत्सवाचे निमंत्रक तथा प्रसिद्ध चित्रपट निर्माते बलभीम पठारे, प्रा. अशोक सागडे, सुधीर लांडगे, प्रसाद सुवर्णपाठकी, अनिल मोहिते, इंजि. राजेंद्र तागड, राजेंद्र पाचे, चंद्रकांत तागड, डॉ.अशोक भोजने, रवींद्र बारस्कर, प्रमोद कांबळे, पवन नाईक, प्रा.ऐश्वर्या सागडे, अनंत जोशी, शशिकांत नजन, ओंकार देऊळगावकर, मकरंद खरवंडीकर, किरण डिडवाणीया, सुनंदा तागड, सुरेखा डावरे, प्रिया ओगले, संगीता पाचे, उत्तरा पंडित व स्वागत व नियोजन समिती यांनी केले आहे. या कार्यक्रमात आय लव्ह नगर हे मीडिया पार्टनर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here