Ahilyabai Holkar : नगरमध्ये शुक्रवारी अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

Ahilyabai Holkar : नगरमध्ये शुक्रवारी अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

0
Ahilyabai Holkar
Ahilyabai Holkar

Ahilyabai Holkar : नगर : विचार भारती, अहिल्यानगर (Ahilyanagar) व उत्कर्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यादेवी होळकर (Ahilyabai Holkar) सांस्कृतिक महोत्सव (Cultural festival) २०२४ चे आयोजन सावेडी उपनगरातील माउली सभागृहात शुक्रवारी (ता. ३१) दुपारी ३ ते रात्री ९ यावेळेत करण्यात आले आहे.

हे देखील वाचा: मुलगी दिली नाही म्हणून मौलनानेच मुलीच्या बापाचा केला खून

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती (Ahilyabai Holkar)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक महोत्सव २०२४ चे कार्यक्रमाचे उदघाटन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उल्का भगवान गवते, इंजि. डी. आर. शेडगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर समारोप व पारितोषिक वितरण रात्री ८.३० वाजता नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व उत्कर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक भोजने व स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.मीनाक्षी करडे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

नक्की वाचा : ‘चित्रपटानंतर गांधींना ओळख मिळाली त्यापूर्वी त्यांना कोणीही ओळखत नव्हतं’- मोदी

अंजली आणि नंदिनी गायकवाड यांचे सुमधुर गायन (Ahilyabai Holkar)

उद्‌घाटन समारंभानंतर स्त्री शक्तीवर आधारित नृत्य कार्यक्रम, नादसंगम फ्यूजन प्रस्तुत मराठी, हिंदी, पंजाबी व ब्रज भाषेतील प्रसिद्ध गीतांची मैफल, इंडियन आयडॉल फेम अंजली आणि नंदिनी गायकवाड यांची सुमधुर गायन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी (एक धगधगत अधिकुंड) ही नाटिका व नंतर समारोप व बक्षीस वितरण होणार आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक महोत्सवाचे कार्याध्यक्ष तथा माजी महापौर बाबासाहेब वाकळे, विचार भारतीचे अध्यक्ष अरूण कुलकर्णी, सांस्कृतिक महोत्सव संयोजक तथा प्रसिद्ध चित्रपट निर्माते बलभीम पठारे, सहनिमंत्रक सुधीर लांडगे, प्रसाद सुवर्णपाठकी, अनिल मोहिते ,इंजि.राजेंद्र तागड आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here