Ahilyadevi : ‘अहिल्यादेवीं’ची मूर्ती आफ्रिकेतील ज्वालामुखी पर्वतावर; ‘अंतरा’ची काैतुकास्पद कामगिरी

Ahilyadevi : 'अहिल्यादेवीं'ची मूर्ती आफ्रिकेतील ज्वालामुखी पर्वतावर; 'अंतरा'ची काैतुकास्पद कामगिरी

0
Ahilyadevi : 'अहिल्यादेवीं'ची मूर्ती आफ्रिकेतील ज्वालामुखी पर्वतावर; 'अंतरा'ची काैतुकास्पद कामगिरी
Ahilyadevi : 'अहिल्यादेवीं'ची मूर्ती आफ्रिकेतील ज्वालामुखी पर्वतावर; 'अंतरा'ची काैतुकास्पद कामगिरी

Ahilyadevi : नगर : पुण्यश्लाेक अहिल्यादेवी (Ahilyadevi) होळकर यांची मूर्ती आफ्रिकेतील (Africa) टांझानिया येथील किलीमांजारो या सुप्त ज्वालामुखीच्या (Volcano) पर्वतावर नेण्याची कौतुकास्पद कामगिरी श्रीसमर्थ विद्या मंदिरची इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी अंतरा नरूटे (वय १०) हिने केली आहे. डाॅ. सोमेश्वर नरूटे यांची ती कन्या आहे. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

नक्की वाचा: एलसीबी विरोधातील तक्रारींची १५ दिवसांत चौकशी; आश्वासनानंतर खासदार लंकेंचे उपोषण मागे

अनेक गड चढण्याचा केला होता सराव (Ahilyadevi)

केनिया देशाच्या सीमेजवळ असलेला हा पर्वत समुद्रसपाटीपासून ५८९५ मीटर (१९३४१ फूट) उंच आहे. टांझानिया देशाच्या ईशान्य भागात पूर्व गोलार्धात ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेला हा जगातील सर्वांत उंच पर्वत आहे. गिर्यारोहणाची आवड असलेले हौसी आणि धाडसी पर्वतप्रेमी किलीमांजारो पर्वताच्या शिखरावर पोहोचण्याची कामगिरी पार पाडत धन्यता अनुभवतात. डाॅ. सोमेश्वर आणि शर्मिला नरूटे या माता-पित्याने आपल्या मुलीच्या कलागुणांना वाव देत तिची आवड ओळखून प्रोत्साहन दिले. नगर जिल्ह्यातील मांजरसुंबा येथील गोरक्षनाथ गड, रतनगड, हरिश्चंद्रगड, कोकणकडा, कळसूबाई शिखर येथे अंतरा हिने गड चढण्याचा आणि उतरण्याचा सराव केला. कळसूबाईला तर तिने स्वच्छता मोहीम राबवली. गड आणि किल्ले पाहत निसर्गाशी समरस होणे हा तिचा छंदच झाला. बालिकाश्रम रस्त्यावरील महावीर मल्लखांब योगा ट्रेनिंग सेंटरमध्ये तिने योगा, रोप मल्लखांब, सिल्क मल्लखांबचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. लेझीम खेळण्यासोबत झांज व टाळ वाजवणेही ती शिकली.

अवश्य वाचा: महसूल प्रशासनाकडून भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

असे पार केले किलीमांजारो पर्वत (Ahilyadevi)

सोलापूर येथील ३६० एक्सप्लोररचे संस्थापक आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंतराने जगात उंच असलेल्या किलीमांजारो या पर्वतावर चढण्याचा संकल्प केला. मुंबईच्या विमानतळावरून तिने आफ्रिकेकडे प्रस्थान केले. तेव्हा तिला निरोप देताना उपस्थित सर्वांचे डोळे भरून आले. किलीमांजारो पर्वतावरील चढाईचा श्रीगणेशा नॅशनल पार्कपासून मोठ्या उत्साहात करण्यात आला. पहिल्या दिवशी मरांगुगेट ते मंडारहट हे १० किलोमीटरचे अंतर कापण्यास ६ तास लागले. मंडारहट ते होरंबू हे १० किलोमीटरचे अंतर कापण्यास ९ तास लागले. होरंबू ते किबू हे १० किलोमीटरचे अंतर पार करण्यास ८ तास लागले. किबू पाॅइंट पासून पुढे काही अंतर पार केले. तेव्हा समुद्रसपाटीपासून एकूण ५,५०० मीटर, १८००० फूट उंच चढाई पूर्ण केल्याचा आनंदोत्सव साजरा करत अंतरा हिने भारत देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा मोठ्या उत्साहात फडकवताना राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचे आणि होमिओपॅथीचे जनक डाॅ.सॅम्युअल हॅनिमन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रभू श्रीरामाची आणि अयोध्या येथील मंदिराची छबी असलेला भगवा श्रद्धने फडकवला तेव्हा तिला अनामिक ऊर्जा मिळाली.

Ahilyadevi : 'अहिल्यादेवीं'ची मूर्ती आफ्रिकेतील ज्वालामुखी पर्वतावर; 'अंतरा'ची काैतुकास्पद कामगिरी
Ahilyadevi : ‘अहिल्यादेवीं’ची मूर्ती आफ्रिकेतील ज्वालामुखी पर्वतावर; ‘अंतरा’ची काैतुकास्पद कामगिरी

एकूण सात दिवसांचा हा प्रवास अवर्णनिय ठरला. आफ्रिकन जंगल, मुरलॅण्ड, १६००० फूट उंचीवर पोहोचल्यावर लागणारे वाळवंट, तेथील थंडी, दिवसा तसेच रात्रीच्या गडद अंधारातील प्रवास, मार्टीन आणि जस्टीन या स्थानिक गाईडकडून मिळणारी माहिती हे सर्व सांगताना अंतरा भारावून जाते. बालवयात अंतराने आफ्रिकेतील किलीमांजारो या पर्वतावर केलेल्या धाडसी चढाईचे कौतुक होत आहे. नगर शहरात तिचे आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात अंतराचे स्वागत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here