Ahilyadevi Holkar : शासकीय दस्तावेजामध्ये अहिल्याबाई ऐवजी अहिल्यादेवी उल्लेख केला जाईल : मुख्यमंत्री 

Ahilyadevi Holkar : शासकीय दस्तावेजामध्ये अहिल्याबाई ऐवजी अहिल्यादेवी उल्लेख केला जाईल : मुख्यमंत्री 

0
Ahilyadevi Holkar
Ahilyadevi Holkar : शासकीय दस्तावेजामध्ये अहिल्याबाई ऐवजी अहिल्यादेवी उल्लेख केला जाईल : मुख्यमंत्री 

Ahilyadevi Holkar : नगर तालुका: लोकमाता व राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांचे कार्य आदर्शवत आहे. त्यामुळे राज्यभरातील मुलींच्या वस्तीगृहांना अहिल्यादेवींचे नाव दिले जाईल, तसेच सर्व शासकीय दस्तावेजामध्ये (Government Document) अहिल्याबाई ऐवजी अहिल्यादेवी असा उल्लेख केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जामखेड तालुक्यातील चौंडी येथे दिली. तसेच धनगर समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचे सूतोवाच त्यांनी केले.

हे देखील वाचा: माझ्या मतदारसंघाप्रमाणे लोकांच्या घरापर्यंत पाणी पोचवणार का?; रोहित पवारांचा राणांना सवाल

जयंती उत्सव कार्यक्रमाचे चौंडीत आयोजन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 जयंती उत्सवाचा कार्यक्रम जामखेड तालुक्यातील चौंडी या त्यांच्या जन्मगावी उत्साहात झाला, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री अतुल सावे, क्रीडामंत्री संजय बनसोडे आदींसह ज्येष्ठ नेते अण्णा डांगे, आमदार बबनराव पाचपुते, मोनिका राजळे, सुरेश धस, संजय शिरसाठ, गोपीचंद पडळकर, दत्तामामा भरणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, उज्वला हाके आदी उपस्थित होते.

नक्की वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा हल्लाबोल

जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे मानले आभार (Ahilyadevi Holkar)

अहिल्यादेवी जयंती जन्मोत्सव समितीचे स्वागत अध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे यांनी प्रास्ताविक केले. अहमदनगरचे नाव अहिल्यानगर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांनी आभार मानले. अहिल्यादेवींचे त्रिशताब्दी जन्म वर्ष सुरू झाल्याने या वर्षभरात अहिल्यादेवींनी राज्यभरात उभारलेल्या विकासकामांचे संवर्धन व्हावे व काही ठिकाणी पुनर्बांधणी व्हावी, चौंडी हे गाव राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here