Ahilyadevi Holkar : अहिल्यादेवी होळकर मिरवणूक नगर शहरात ठरली आकर्षण 

0
Ahilyadevi Holkar
Ahilyadevi Holkar


Ahilyadevi Holkar : नगर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त नगर शहरातून उत्कर्ष फाउंडेशन व विचार भारती संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी संस्कृतीचे (Tribal culture) दर्शन घडवित पारंपारिक (Traditional) भव्य शोभायात्रा काढण्यात आली. येळकोट येळकोट जय मल्हार… च्या घोषणांनी व आहिल्यादेवींच्या जय घोषाने संपूर्ण नगर दणाणून गेले होते.

शोभायात्रा सकाळी १० वा  हुतात्मा करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथून सुरु झाली.  दिल्लीगेट, चितळे रस्ता, नवीपेठ, घुमरे गल्ली, पांचपीर चावडी, माळीवाडा, मार्केट यार्ड चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे सांगता झाली. नंदूरबार, सांगली, अकोले येथून आलेल्या कलाकारांनी आदिवासी  नृत्य, धनगरी ढोल पथक(गजी नृत्य),आदिवासी फुगडी, गौरी, टिपरी व कांबड नृत्याचे बहारदार सादरीकरण केले. शहरात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे नृत्य मिरवणुकीचे आकर्षण ठरले.घोड्यांच्या रथातील बग्गीत असलेली अहिल्यादेवी होळकर यांची मुर्ती व त्यांच्या वेशभुषेतील महिलेने सर्वांचे लक्ष वेधले. 


मिरवणुकीत माजी महापौर बाबासाहेब वाकळे, बलभीम पठारे, उत्कर्ष फाउंडेशनचे डॉ. अशोक भोजने, इंजि.डी.आर.शेंडगे, डॉ. राहुल पंडित, प्रा. बाळासाहेब शेंडगे, चंद्रकांत तागड, डॉ.सचिन सोलाट, सचिन भोजने, डॉ.महेंद्र शिंदे, डॉ. अविनाश गाडेकर, नानासाहेब देशमुख, सागर पदीर, रवींद्र मुळे, बलभीम पठारे, अनिल मोहिते, अशोक गायकवाड, राजू तागड, अनिल ढवण, पुण्यश्लोक अहिल्यादेवी फाउंडेशनच्या डॉ.मीनाक्षी करडे, डॉ. उषा शेंडगे, डॉ. पुनम भोजने,अश्‍विनी शेंडगे, ज्योती भोजने आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here