Ahilyanagar : ‘गुगल मॅप’वर अहमदनगरचे झाले अहिल्यानगर

Ahilyanagar : अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ करण्याचा निर्णय नुकताच राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

0
Ahilyanagar

Ahilyanagar : नगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अहमदनगर शहराच्या नामांतराची घोषणा करताच गुगल (Google)ने आपल्या सर्च इंजिनमध्ये या शहराच्या बदललेल्या नावाचा उल्लेख अहिल्यानगर (Ahilyanagar) असा केला आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिलेली नसल्याने अद्याप नामांतरावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही. तरीही ‘गुगल’ने एवढी घाई का केली, असा प्रश्न नेटिझन्सकडून विचारला जात आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणुका का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल!

Ahilyanagar

अहिल्यानगर करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय (Ahilyanagar)

अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ करण्याचा निर्णय नुकताच राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले, “राज्य सरकारचा हा निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. या निर्णयाने अहमदनगर शहरवासियांची, जिल्हावासियांची, महाराष्ट्रातील तेरा कोटी नागरिकांची महत्वाची इच्छा पूर्ण झाली आहे” परंतु, अजूनही या नामांतरावर केंद्राचे शिक्कामार्तब झालेले नाही.

Ahilyanagar

अवश्य वाचा ः मोठी बातमी! राज्यातील शालेय शिक्षकांना आता ड्रेस कोड अनिवार्य

चर्चेला उधान (Ahilyanagar)

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाने घेतला असला, तरी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा मतदारसंघाचे नाव अहमदनगरच राहणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी स्पष्ट केले. नामांतराची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने जुनेच नाव वापरण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, गुगलने आपल्या सर्च इंजिनमध्ये या शहराच्या बदलेल्या नावाचा उल्लेख अहिल्यानगर असा केला आहे. त्यामुळे चर्चेला चांगलेच उधान आले आहे. 

Ahilyanagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here