Ahilyanagar | नगर : येथील भारतीय डाक विभागाच्या (india post) वरिष्ठ अधीक्षक कार्यालयाचे नाव अहिल्यानगर (Ahilyanagar) करावे या मागणीसाठी आंदोलने झाली होती. अखेर सोमवारी (ता. १७) डाक विभागाने आदेश काढत अहिल्यानगरमधील सर्व पोस्ट कार्यालये व वरिष्ठ अधीक्षक कार्यालयाचे नाव अहमदनगरच्या जागी अहिल्यानगर केले आहे.
अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करणार,मात्र योजना बंद करणार नाही- अजित पवार
अखेर नामांतर झाले (Ahilyanagar)
राज्य व केंद्र सरकारने अहिल्यानगरचे नामांतर करून सहा महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी झाला आहे. तरीही भारतीय डाक विभागाकडून अहिल्यानगरमधील कार्यालये व त्यांच्या पत्त्यांवर अहिल्यानगर असे नामकरण करून घेतले नव्हते. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासह अनेक सामाजिक संघटनांनी आंदोलने केली होती. त्यामुळे पोस्ट कार्यालयातील वरिष्ठ अधीक्षकांनी नामांतराबाबत २५ फेब्रुवारीपासून वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार अखेर सोमवारी (ता. १७) जिल्ह्यातील पोस्ट कार्यालये व वरिष्ठ अधीक्षक कार्यालयाचे नाव अहिल्यानगर करण्याचा आदेश निघाला आहे. त्यानुसार तात्काळ पोस्ट कार्यालयावरील नावे बदलण्यात आली आहेत. या संदर्भातील आदेश वरिष्ठ डाक अधीक्षक हेमंत खाडकेकर यांनी दिले आहेत.
नक्की वाचा : अखेर अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची उद्या घरवापसी
पत्रव्यवहारातील पत्त्यात बदल (Ahilyanagar)
या आदेशामुळे आता पत्रव्यवहारातही अहिल्यानगर असे लिहिता येणार आहे. यापूर्वी शासकीय पत्रव्यवहार व इतर पत्रव्यवहारांत अहमदनगर असेच लिहावे लागत होते. हिंदुत्ववादी संघटनांकडून सह विविध राजकीय पक्षांकडून या आदेशाचे स्वागत करण्यात येत आहे.