Ahilyanagar : अहिल्यानगर गौरव दिन व पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन

0
Ahilyanagar : अहिल्यानगर गौरव दिन व पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन
Ahilyanagar : अहिल्यानगर गौरव दिन व पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन

Ahilyanagar : नगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या (Punyashlok Ahilyadevi Holkar) त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विचार भारती व जनसेवा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर गौरव दिन व पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचे (Cultural Festival) आयोजन अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) करण्यात आले आहे. या महोत्सवा अंतर्गत राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धांचे (State Level Competitions) आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा प्रार्थमिक व अंतिम अशा फेऱ्यांमध्ये होणार आहे, अशी माहिती संयोजन समितीचे विशारद पेटकर यांनी दिली.

नक्की वाचा : राजधानी दिल्लीला अलर्ट;लाल किल्ला,कुतुब मिनार सह ऐतिहासिक इमारतींच्या सुरक्षेत वाढ

महाविद्यालयीन विधार्थी व १८ वर्षांपुढील स्पर्धकांसाठी खुली

ही राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धा महाविद्यालयीन विधार्थी व १८ वर्षांपुढील स्पर्धकांसाठी खुली आहे. या स्पर्धेसाठी स्पर्धेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक कुशल प्रशासक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे धार्मिक कार्य, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सबलीकरणाचे प्रतीक व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक राष्ट्रवादाचे प्रतीक हे विषय देण्यात आहेत.

अवश्य वाचा : पाकिस्तानचा भारतावर ‘डान्स ऑफ द हिलरी’ व्हायरसद्वारे सायबर हल्ल्याचा डाव?

वीस स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी होणार निवड (Ahilyanagar)

स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी स्पर्धकांनी स्पर्धेच्या विषयांपैकी निवडलेल्या विषयावर जास्तीत जास्त पाच मिनिटे स्वतःचा भाषण करतानाचा व्हिडिओ तयार करून संयोजकांकडे दिनांक १६ मे पर्यंत पाठवायचा आहे. त्याचे परीक्षण होऊन प्राथमिक फेरीतून निवडलेल्या वीस स्पर्धकांची दि.२३ मे रोजी होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड केली जाणार आहे. स्पर्धेची अंतिम फेरी न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयातील सेमिनार हॉलमध्ये सकाळी १० ते ५ या वेळेत होणार आहे.

या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम १० हजार, द्वितीय ७ हजर, तृतीय ५ हजार व उत्तेजनार्थ २००० व १००० रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत, अधिक माहितीसाठी ९२२५३०२०३८ व ८०८०७२८५३५ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन स्पर्धेच्या संयोजीका ऐश्वर्या सागडे यांनी केले आहे.