Ahilyanagar : नगर : अहिल्यानगरचा (Ahilyanagar) दैदिप्यमान इतिहास, जिल्ह्यातील सर्व संत मंडळी व अहिल्यादेवींचे (Punyashlok Ahilyadevi Holkar) कार्य याची सांगड असलेले ‘अहिल्यानगर गौरव गीताचे’ (Ahilyanagar Gaurav Geet) शनिवारी (ता. २४) माऊली सभागृहात झालेल्या कार्यक्रमात लोकार्पण झाले. विचार भारतीच्या (Vichar Bharati) संकल्पनेतून व गौतम मुनोत प्रोडक्शन निर्मित जयजयकार करू अहिल्यादेवींचा… जयजयकार करू अहिल्यानगरीचा… हे गौरव गीत जेव्हा एलएडी स्क्रीनवर दाखण्यात आले. तेव्हा उपस्थित नगरकरांनी टाळ्यांचा कडकडाट करत उभे राहून भारतमातेचा व अहिल्यादेवींचा जयघोष करत गीताला मानवंदना दिली.
नक्की वाचा : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणालाच विश्वासात घेत नाहीत’-संजय राऊत
आ. जगताप व स्वागताध्यक्षा धनश्री विखे यांच्या हस्ते लोकार्पण
या अहिल्यानगर गौरव गीताचे लोकार्पण आ.संग्राम जगताप व पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाच्या स्वागताध्यक्षा धनश्री विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी विचार भारतीचे अध्यक्ष अरुणराव कुलकर्णी, ज्येष्ठ मार्गदर्शक रवींद्र मुळे, निर्माते गौतम मुनोत, गीतकार संजय धोत्रे, संगीत संयोजक डॉ. निरज करंदीकर, श्रीमती मुनोत व प्रसिद्ध लेखक व विचारवंत प्रशांत पोळ आदींसह विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
अवश्य वाचा : मुंबईनंतर पुणे व सोलापूर मध्ये मान्सूनची एन्ट्री!
यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले, (Ahilyanagar)
जिल्ह्याचे नामांतर झाल्यावर वेगळा अभिमान सर्वांमध्ये जागृत झाला आहे. जिल्ह्याच्या नामांतराने गुलामगिरीचे दारिद्र्य दूर झाले आहे. जसे नाव बदलले तसा आता विकासही सुरु आहे. विचार भारतीच्या उपक्रमांमधून समाजाला दिशा देण्याचे कार्य होत आहे. अहिल्यानगर गौरव गीत पाहून अंगावर रोमांच उभे राहिले आहेत. हे गीत सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल.
गीताचे निर्माते गौतम मुनोत म्हणाले, १०० टक्के मेड इन नगर असलेल्या या गीतासाठी सर्वांनी रात्रंदिवस खूप मेहनत घेतली आहे. नगरकर या गौरव गीताला स्वीकारून जास्तीत जास्त शेअर करतील. विचार भारतीने एक चांगली व प्रेरणादायी निर्मिती करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी धन्यवाद मानले. यावेळी संगीतकर डॉ. नीरज करंदीकर, गीतकार संजय धोत्रे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विराज मुनोत यांनी केले.
यावेळी भावना व्यक्त करताना रवींद्र मुळे म्हणाले, नगरच्या नामांतरासाठी विचार भारतीने ध्यास घेतला होता. सुदैवाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षात हे नामांतर झाले आहे. जिल्ह्याचा दैदिप्यमान इतिहास पुढील पिढीला समजावा, अहिल्यानगरी बद्दल सर्वाना अभिमान वाटावा यासाठी खास गौरव गीताची निर्मिती केली आहे. हे गीत सर्व शाळांच्या मध्ये रोज ऐकले जावे. शासकीय कार्यक्रमात वाजावे आणि त्यातून उज्वल नव्या पिढी निर्माण व्हावी यासाठी विचार भारती प्रयत्नशील आहे.
अहिल्यानगर गौरव गीताची सविस्तर माहिती अशी, संकल्पना विचार भारती, निर्माता गौतम मुनोत, गीतकार संजय धोत्रे, गायक रोहित राऊत व अपूर्वा निषाद, संगीतकार डॉ. नीरज करंदीकर, कोरस अजित विसपुते, अमृता बेडेकर, ऋतुजा पाठक, श्रेया सुवर्णपाठकी, दीप्ती करंदीकर, चैतन्य जोग. व्हिडिओ एडिटर प्रथमेश बर्डे. निर्मिती पश्चात विराज मुनोत व प्रशांत जठार.