
Ahilyanagar : नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील बारातोटी कारंजा परिसरात धार्मिक (Religious) भावना दुखावल्याने दोन गटांत किरकोळ वाद झाले. कोतवाली पोलिसांकडून (Kotwali Police Station) संबंधितांवर गुन्हा दाखल (Crime Registered) करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशातच संतप्त गटाने आज (ता. २९) सकाळी ११ वाजता अचानक छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावर कोठला येथे रास्ता रोको केला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.
अवश्य वाचा: नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले मंत्री केवळ फोटोसेशन करतात : थोरात
मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. ही घटना सोमवारी (ता. २९) सकाळी घडली. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, एमआयडीसीएचे माणिक चौधरी, तसेच क्यूआरटी, राज्य राखीव पोलीस दल यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नक्की वाचा : मोठी बातमी!आता लाडक्या बहिणींना मिळणार कर्ज!
पोलिसांचा जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज (Ahilyanagar)
अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागातील बारातोटी कारंजा येथे धर्मगुरुंबद्दल रस्त्यावर रांगोळी काढून आक्षेपार्ह कृती केल्याप्रकरणी दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आंदोलकांना समजावले, मात्र, सोमवारी याचे पडसाद उमटले. विटंबना करणाऱ्या संबंधिताविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी अहिल्यानगर -छत्रपती संभाजीनगर रोडवरील कोठला भागात कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. मात्र संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आंदोलकांनी आता आंदोलन करण्याची गरज नाही, असे पोलीस समजून सांगत होते. दरम्यान छत्रपती संभाजीनगर- अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहतुकीत अडथळा येऊ नये म्हणून पोलीस वारंवार विनंती करत होते. मात्र, आंदोलकांनी आक्रमक पावित्रा घेतला. पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे काही वेळ गोंधळ आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यानतर पोलिसांनी ३० ते ३५ जणांना ताब्यात घेतले आहे. या दरम्यान, हा तणाव आता शांत झाला असून पोलिसांनी संबंधित युवकाला व आंदोलन करणाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे. जमावाला पांगवण्यासाठी हा लाठीचार्ज करण्यात आला आला असल्याचे पोलीस प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आले.