Ahilyanagar : अहिल्यानगर नावाला हायकाेर्टात आव्हान; २५ जुलैला सुनावणी

Ahilyanagar : अहिल्यानगर नावाला हायकाेर्टात आव्हान; २५ जुलैला सुनावणी

0
Ahilyanagar : अहिल्यानगर नावाला हायकाेर्टात आव्हान; २५ जुलैला सुनावणी
Ahilyanagar : अहिल्यानगर नावाला हायकाेर्टात आव्हान; २५ जुलैला सुनावणी

Ahilyanagar : नगर : अहमदनगरचा (Ahmednagar) नामांतराचा वाद आता न्यायालयात (Court) गेला आहे. अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर (Ahilyanagar) करण्याच्या राज्य सरकारच्या (State Govt) निर्णयाविरोधात औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. २५ जुलैला याबाबत सुनावणी हाेणार आहे.

नक्की वाचा : ज्यांनी आमचं काम केलं ते आमचे’;शरद पवारांचे सूचक विधान

निकषांचे पालन होत नसल्याचा दावा

नामांतराचा ठराव नियमानुसार झालेला नाही, यासाठी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या निकषांचे पालन होत नाही, यासह इतर विविध मुद्द्यांकडे लक्ष वेधत हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, आर्किटेक्ट अर्शद शेख व पुष्कर सोहोनी यांनी ही खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती रवींद्र घुगे व वाय. डी. खोब्रागडे यांच्यासमोर ही याचिका आहे. यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, नाशिक विभागीय आयुक्त आणि अहमदनगर महापालिका आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

अवश्य वाचा : देशातील ७० कोटी जनतेला दिलासा मिळणार;तांदळासह डाळींचं उत्पादन वाढणार

अद्यापही अहमदनगर हेच नाव वापरात (Ahilyanagar)

प्रशासकीय पातळीवर अद्यापही अहमदनगर हेच नाव वापरात आहे. आता लवकरच विधानसभा निवडणूक येणार आहे. त्यापूर्वी केंद्र सरकारकडून नामांतर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी राज्य सरकारकडून पाठपुरावा सुरू आहे. तर दुसरीकडे उच्च न्यायालयात याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर न्यायालय काय निर्णय घेणार, हे सुनावणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here