Ahilyanagar News Update | अहिल्यानगरच्या ‘या’ भागातील शेतकऱ्यांवर महावितरणच्या निर्णयाची कुऱ्हाड; दोनच तास मिळणार वीज

0
Ahilyanagar
Ahilyanagar

Ahilyanagar News Update | नगर : भारतात (India) सध्या सरकार डिजिटल इंडिया, पंतप्रधान सौर घर योजना व कृषी सौर योजनेच्या गप्पा मारल्या जात आहेत. मात्र, अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील या ग्रामीण भागात शेतीसाठी केवळ दोन तास वीज दिली जात आहे.

हे वाचा – दुर्गापूर येथे बिबट्या जेरबंदसर्वात मोठा बिबट्या बघण्यास गर्दी

xr:d:DAFsn7WZUOg:1271,j:3652833494717991405,t:24010205

शेतकरी आक्रमक (Ahilyanagar)

अन्नदाता आजही मूलभूत विजेसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करतोय. अहिल्यानगर जिल्ह्यातील वांबोरी परिसरातून एक संतापजनक वास्तव समोर आले आहे. पिकांना पाण्याची गरज असताना, वांबोरीतील शेतकऱ्यांना दिवसातून केवळ दोन तास वीज दिली जात आहे. विशेष म्हणजे परिसरात सोलर प्लांट उपलब्ध असूनही ही वीज कपात का? असा सवाल आता विचारला जातोय. पिके डोळ्यादेखत जळून चालल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर वांबोरी वीज उपकेंद्रावर धडक दिली.

अवश्य वाचा – श्री साईबाबा संस्थानला साईभक्ताने देणगी स्वरूपात स्कूल बस केली अर्पण

प्राजक्त तनपुरे म्हणाले… (Ahilyanagar)

या आंदोलनाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी महावितरणच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. “शेतकऱ्यांसाठी सोलर पॉईंटची योजना असतानाही वीज मिळत नसेल, तर हे अत्यंत दुर्दैवी आहे,” असे त्यांनी नमूद केले.

हे पहा – अंमली पदार्थ तस्करी विरोधात पोलिसांचा मास्टरप्लॅन; कृष्ण प्रकाशांनी टाकलं निर्णायक पाऊल

प्रशासनाला निर्वाणीचा इशारा (Ahilyanagar)

शेतकऱ्यांनी आता प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. जर पुढील तीन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर वांबोरी येथे ‘चक्काजाम’ आंदोलन करण्यात येईल. राहुरी तालुक्या लगतच्या अहिल्यानगर तालुक्यातील भागांतील शेतीला रात्री वीज पुरवठा होत आहे. आता तरी महावितरण झोपेतून जागी होणार का? आणि बळीराजाला हक्काची वीज मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here