Ahilyanagar Crime Update | कोठला परिसरात मध्यरात्री गोळीबाराचा थरार; युवक गंभीर जखमी 

0

Ahilyanagar Crime Update | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील कोठला परिसरात बुधवारी (ता. ११) रात्री उशिरा झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज चेंबरसमोर रात्री सुमारे सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. या गोळीबारात अबरार मुख्तार शेख हा २५ ते ३० वर्षे वय असणारा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ अहिल्यानगरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे वाचा – समाजकल्याण वसतीगृहातील माजी विद्यार्थ्याची तालुका कृषी अधिकारी पदावर निवड

अचानक त्याच्यावर गोळी झाडली (Ahilyanagar)

प्राथमिक माहितीनुसार, अबरार शेख हा राज चेंबरसमोर उभा असताना अचानक त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. गोळी त्याच्या शरीराच्या खालच्या भागावर लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात एकचं गोंधळ उडाला. स्थानी नागरिकांनी तातडीने या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली आणि जखमी अबरारला ताटाकल जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अवश्य वाचा – अभिनवमध्ये अमली पदार्थांचे दुष्परिणाम विषयी मार्गदर्शन

वैयक्तिक वादातून हा गोळीबार (Ahilyanagar)

या घटनेमागे मुकुंदनगर परिसरातील जैद सय्यद याचे नाव समोर येत असल्याची माहिती आहे. वैयक्तिक वादातून हा गोळीबार झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र नेमका वाद कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर येऊ शकलेली नाहीये. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून पंचनामा करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.

हे पहा – स्वीकृत नगरसेवकांचा फॉर्म्युला ठरला; कोणत्या पक्षाला किती जागा?

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण (Ahilyanagar)

या गोळीबाराच्या घटनेमुळे कोठला आणि मुकुंदनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान जखमी अबरार शेख याची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती असून पुढील तपस सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here