Ahilyanagar : जामखेड : जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आज 13 ऑगस्ट रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 228 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे (Annasaheb Dange) हे होते. यावेळी राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा राम शिंदे (Ram Shinde) म्हणाले की राज्याच्या आगामी विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेपुर्वी अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर (Ahilyanagar) होणार आहे.
नक्की वाचा : आमची सत्ता आली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवू’- संजय राऊत
आमदार प्रा.राम शिंदे म्हणाले की,
औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामकरण करायला ४० वर्षे लागले पण पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जन्मभूमीमध्ये तीनशेव्या जयंतीला सामोरे जात असताना आपण मागणी केली की या जिल्ह्यात अहिल्यादेवींची जन्मभूमी आहे. त्यामुळे जिल्ह्याचं नामकरण अहिल्यानगर करण्यात यावं आणि अवघ्या 40 मिनिटांत नामकरणाची घोषणा झाली. दुसऱ्या जयंतीला त्याची कार्यवाही करून मुख्यमंत्री इथे हजर राहिले. प्रस्ताव दिल्लीला गेला. पुण्यतिथीच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो की विधानसभा निवडणुकीच्या अचारसंहितेपुर्वी अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर होणार म्हणजे होणार असे म्हणताच उपस्थित धनगर समाज बांधवांनी एकच जल्लोष केला.
अवश्य वाचा: मनाेज जरांगे गरजले; आता विधानसभेला दणादण नाव घेऊन पाडणार, कुणाचे टेन्शन वाढणार?
धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित (Ahilyanagar)
या कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तसेच यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार रामहरी रूपनवर, धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ॲड चिमणभाऊ डांगे,श्रीराम पुंडे , बबनराव रानगे, डॉ अलकाताई गोडे, सुभाष सोनवने, सुनिल वाघ, संगीता ख़ोत, गड़देमहाराज, सह राज्यातील धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.