Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये महिला बचत गटांची भरारी; ३५३ कोटींचे विक्रमी कर्जवाटप

Loan Distribution : अहिल्यानगरमध्ये महिला बचत गटांची भरारी; ३५३ कोटींचे विक्रमी कर्जवाटप

0
Loan Distribution : अहिल्यानगरमध्ये महिला बचत गटांची भरारी; ३५३ कोटींचे विक्रमी कर्जवाटप
Loan Distribution : अहिल्यानगरमध्ये महिला बचत गटांची भरारी; ३५३ कोटींचे विक्रमी कर्जवाटप

Ahilyanagar : नगर : केवळ बचतीपुरती मर्यादित न राहता, जिल्ह्यातील बचत गटांची चळवळ आता परिवर्तनाचे प्रभावी साधन बनली आहे. जिल्ह्यात सध्या ३० हजार ११२ बचत गट सक्रिय असून, त्यांच्याशी ३ लाख १५ हजारांहून अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत. या गटांना बँकांशी जोडून १६८ कोटी २० लाख रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असताना, प्रत्यक्षात तब्बल ३५३ कोटी ०९ लाख रुपयांचे विक्रमी कर्जवाटप करण्यात आले आहे.

हेही वाचा : लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी शरीरसुखाची मागणी ; नेमकं प्रकरण काय?

उद्योगनिर्मितीच्या क्षेत्रात भक्कम पाऊल

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि महिला व बाल विकास विभाग यांच्या समन्वयातून अहिल्यानगर जिल्ह्यातील महिला स्वयं सहाय्यता बचत गटांनी सक्षमीकरणाची ही दमदार भरारी घेतली आहे. या भांडवलाच्या बळावर आणि शासनाच्या प्रशिक्षण सुविधांच्या मदतीने महिलांनी उद्योगनिर्मितीच्या क्षेत्रात भक्कम पाऊल टाकले आहे. मसाले, पापड, लोणची, बेकरी उत्पादने, हस्तकला, मेणबत्त्या आणि रेडीमेड कपडे यांसह दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन व भाजीपाला उत्पादन अशा शेतीपूरक व्यवसायातही महिलांनी मोठी झेप घेतली आहे.

नक्की पहा : मुक्ताईनगरात बिबट्याची दहशत; तीन तासांच्या प्रयत्नानंतर जेरबंद

जिल्हास्तरावर प्रदर्शने आणि मेळावे (Ahilyanagar)

दर्जेदार उत्पादन, स्थानिक चव आणि आकर्षक पॅकेजिंगच्या जोरावर महिलांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळत आहे. यासाठी जिल्हास्तरावर प्रदर्शने आणि मेळावे आयोजित केले जात असून, डिजिटल तंत्रज्ञानाचाही प्रभावी वापर केला जात आहे. उमेद अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘उमेद मार्ट’ या ई-व्यापार प्लॅटफॉर्मवर जिल्ह्यातील सुमारे १८० उत्पादने ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.