Ahilyanagar नगर : नगर जिल्ह्याला अहिल्यानगर (Ahilyanagar) नाव देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry) हिरवा कंदील दिला असून, हे नाव देण्यास विभागाची कोणतीही हरकत नसल्याचे पत्र दिल्याने जिल्ह्याच्या नामांतराचा मार्ग सुकर झाला आहे, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सांगितले.
नक्की वाचा : जाती-धर्मावरुन द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी : सुजय विखे पाटील
नामांतरात प्रत्येक विभागाची ना हरकत आवश्यक (Ahilyanagar)
जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याची मागणी झाल्यानंतर राज्यातील महायुती सरकारने अहिल्यानगर असे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. नामांतराच्या बाबतीतील सर्व प्रक्रिया ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत पूर्ण होत असल्याने प्रत्येक विभागाची ना हरकत आवश्यक असते. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नामांतराच्या बाबतीत हरकत नसल्याचे पत्र जारी करुन अहिल्यानगर नावास मान्यता दिली आहे. या नावाचे कोणतेही रेल्वेस्थानक देशात नसल्याचेही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केल्याने जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यातील पहिला टप्पा पूर्ण होत असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.