Ahilyanagar : महायुतीकडून अहिल्यानगर नामांतराची वचनपुर्ती – राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar : महायुतीकडून अहिल्यानगर नामांतराची वचनपुर्ती - राधाकृष्ण विखे पाटील

0
Ahilyanagar : महायुतीकडून अहिल्यानगर नामांतराची वचनपुर्ती - राधाकृष्ण विखे पाटील
Ahilyanagar : महायुतीकडून अहिल्यानगर नामांतराची वचनपुर्ती - राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar : नगर : अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याच्या मागणीवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या (State Cabinet) बैठकीत शिक्कामोर्तब झाले. नामांतराच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारने (Central Govt) मंजुरी दिल्यानंतर आता अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर (Ahilyanagar) म्हणून ओळखला जाणार आहे. नामांतराच्या या निर्णयाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी स्वागत करून आनंद व्यक्त केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीदिनास ३०० वर्षे पूर्ण होत असतानाच हा निर्णय होणे ही एक ऐतिहासिक घटना असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.    

नक्की वाचा : ठरलं तर मग!हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार    

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती घोषणा

मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे नाव देण्यात यावे, अशी मागणी सातत्याने होत होती. चौंडी येथे झालेल्या अहिल्यादेवींच्या जयंतीदिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याला, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे याबाबत पाठपुरावा केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही नामांतराच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्याचे विनंतीपत्र दिले होते. यापूर्वी रेल्वे मंत्रालयाने अहिल्यानगर नावाला कोणतेही हरकत नसल्याचे राज्य आणि जिल्हा प्रशासनाला कळवले होते.

अवश्य वाचा : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब (Ahilyanagar)

केंद्र सरकारने अहिल्यानगर नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयाबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आनंद व्यक्त केला. हा निर्णय होण्यासाठी योगदान देता आले याचा आनंद आहे. महायुती सरकारने दिलेल्या शब्दांची वचनपुर्ती केल्याचे त्यांनी सांगितले.