Ahilyanagar : नगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांचे जन्म गाव असलेल्या जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यात आले आहे. याबाबत शासन आदेश पारित झाला असून प्रशासकीय पातळीवर नामांतर करण्यात आले आहे. मात्र, काही विघ्नसंतोषी लोकांनी नामांतराबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल केला असून या दाव्यात जिल्हा प्रशासनाने सक्षमपणे भूमिका घ्यावी, अशी मागणी करत याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ (Siddharam Salimath) यांना आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी दिले.
नक्की वाचा : अहिल्यानगर मधील तालमींचा इतिहास
निवेदन देताना उपस्थिती उपस्थिती
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वधुवर सुचक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र तागड, माजी नगरसेवक काका शेळके, निशांत दातीर, इंजि. राजेंद्र पाचे, ऋषि ढवन, प्रथमेश तागड, संतोष गावडे, सचिन चितळकर, बाळासाहेब शिपनकर, महादेव ढाकणे, राहूल आडसूळे, तुषार यादव, विलास मोडवे, वैभव वाघ, विजय शिपनकर, संतोष तागड, रविंद्र गावडे, मयुर ढगे, संग्राम शेळके, अर्थव औटी, रवी राऊत, प्रविण पवार, कृष्णा टपले आदी मान्यवर उपस्थित होते.
अवश्य वाचा : …म्हणून मला टोकाचा निर्णय घ्यावा लागला’; शिवराज राक्षेचं वक्तव्य
न्यायालयाकडून महापालिकेला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश (Ahilyanagar)
अहिल्यानगर नामांतराचा सकल हिंदू समाजाने स्विकार केला आहे. मात्र, नामांतर विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून खंडपीठाने नाशिक व अहिल्यानगर महानगर पालिकेला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहे. या जनहित याचिकेतील आक्षेपांना जिल्हा प्रशासनाने सक्षमपणे प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे. स्थानिक जनतेची भावना आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेवून प्रशासनाने जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर कायम रहावे, यासाठी न्यायालयात सकारात्मक भूमिका घ्यावी, असे निवेदनात नमुद केले आहे.