Ahilyanagar : नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) प्रधान डाकघराच्या (Head Post Office) वरिष्ठ पोस्टमास्तर पदी हेमंत खडकेकर (Hemant Khadkekar) यांची नियुक्ती झाली. त्यांनी प्रभारी पोस्टमास्तर संजय बोदर्डे यांच्याकडून आज (ता. १८) पदभार स्वीकारला. मागील काही दिवसांपासून हे पद रिक्त होते. यापूर्वी ते श्रीरामपूर येथील अधीक्षक डाकघर येथे कार्यरत होते.
नक्की वाचा : हिंदू धर्म विचाराची सत्ता महापालिकेवर बसविणार : संग्राम जगताप
विविध प्रशासकीय पदावर काम
हेमंत खडकेकर यांनी आपल्या प्रशासकीय सेवेला २००१ मध्ये नांदेड विभागातून उपविभागीय डाक निरीक्षक या पदापासून केली. त्यानंतर राज्यभरातील भुसावळ, अलिबाग, रायगड, नाशिक, परभणी, रिजनल ऑफिस, सीएसडी, पीएसडी नाशिक या ठिकाणी विविध प्रशासकीय पदावर त्यांनी काम पाहिले आहे.
अवश्य वाचा : वांजोळीत दाणी वस्तीवर जबरी चोरी; चोरट्यांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी
कामगार प्रिय प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख (Ahilyanagar)
त्यांनी मागील तीन वर्षांत श्रीरामपूर विभागात अधीक्षक म्हणून काम करत असताना, सातत्याने विभागात नवनवीन उपक्रम राबवल्याने एक कामगार प्रिय प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. श्रीरामपूर विभागात कार्यरत असताना सातत्याने अहिल्यानगर विभागाचा अतिरिक्त प्रभारी अधीक्षक म्हणून काम पाहिलेले असल्याने नगर विभागाची माहिती आहेच ,आता आगामी कालावधीत सर्वाना सोबत घेत डाक विभागाच्या सर्व योजना अधिकाधिक ग्राहकांभिमुख करण्याचा प्रयत्न करत कामकाज करू असे सांगितले.
त्याचे पोस्टल संघटनेचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे कार्याध्यक्ष संतोष यादव यांनी त्याचे स्वागत केले. यावेळी संजय बोदर्डे, सचिन थोरवे, वंदना नगरकर, अर्चना भुजबळ, दीपक नागपुरे, अरुण रोकडे, सुभाष बर्डे, आसिफ शेख, तान्हाजी सूर्यवंशी, संतोष घुले, सागर पंचारिया, बाबासाहेब शितोळे यांच्यासह डाक कर्मचारी उपस्थित होते.