Ahilyanagar Crime News : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील (Ahilyanagar Crime News) साकत खुर्द येथील कार्ले वस्ती येथे किरकोळ वादाच्या कारणातून चौघांनी तरूणाला मारहाण (Beating) केल्याची घटना समोर आली आहे. सूर्यकांत छबू पवार (वय ४०, रा. साकत खुर्द, कार्ले वस्ती) असे जखमीचे नाव असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात (Ahilyanagar Taluka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : अखेर नरभक्षक बिबट्या जेरबंद; वनविभागाची कारवाई
किरकोळ वादाचा रागातुन हल्ला (Ahilyanagar Crime News)
अशोक रंगनाथ वाघ, राजेंद्र रंगनाथ वाघ, विजय आसाराम वाघ आणि शाम राजेंद्र राजेंद्र वाघ (सर्व रा. साकत, कार्ले वस्ती) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. शनिवारी (ता. १५) फिर्यादी चारचाकी वाहनातून आपल्या कामानिमित्त जात असताना कार्ले वस्ती तलावाजवळ संशयित आरोपींनी त्यांना अडवून त्याच्यावर हल्ला केला. एक दिवस आधी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून अशोक वाघने कोयत्याने फिर्यादीला दुखापत केली. तर इतर संशयित आरोपींनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जिवेमारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
नक्की वाचा : कारमधून तब्बल एक कोटीची रोकड जप्त; संगमनेरमध्ये मोठी कारवाई



