Ahilyanagar Doctor Corona Case : नगर : अहिल्यानगर शहरातील नामांकित सहा डॉक्टरांविरोधात (Ahilyanagar Doctor Corona Case) तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) कटकारस्थान करणे, खोटे कागदपत्र (Fake Documents) तयार करणे, तसेच चुकीच्या उपचाराने मृत्यूस कारण बनणे, फसवणूक करणे, पुरावा नष्ट करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या याबाबत दोन्ही डॉक्टरांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांचा अंतरिम जामीन फेटाळला होता. आज त्या अर्जावर पुन्हा सुनावणी झाली असता दोन्ही डॉक्टरांनी जामीन अर्ज मागे घेतला आहे.
नक्की वाचा : प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत ११ नोव्हेंबरला; महापालिकेचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल (Ahilyanagar Doctor Corona Case)
करोनाचा खोटा अहवाल बनून अवयवदानाची तस्करी केला असल्याचा आरोप अशोक बबनराव खोकराळे (वय-४७, पाईपलाईन रोड, सावेडी, ता.जि. अहिल्यानगर) यांनी फिर्यादीतून केला होता. याबाबत डॉ. गोपाळ बहुरुपी, डॉ. सुधीर बोरकर (रा.अहिल्यानगर), डॉ. मुकुंद तांदळे, (रा. सावेडी, अहिल्यानगर), डॉ. अक्षयदीप झावरे पाटील (रा. अहिल्यानगर), डॉ. सचिन पांडुळे (रा. अहिल्यानगर), डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पीटल, विळद घाट, अहिल्यानगर येथील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टर व इतर अज्ञात कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अवश्य वाचा: दोन किलो सोने कारागिराने केले लंपास; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
याबाबत डॉ. गोपाळ बहुरुपी (रा. न्युक्लिअस हॉस्पिटल, डॉ. सुधिर बोरकर यांनी मंगळवारी (ता. २१) रोजी जामीन साठी अर्ज केला होता. मात्र, न्यायाधीश एम. एच. शेख यांनी जामीन अर्ज फेटाळला होता. आज पुन्हा सुनावणी दरम्यान दोन्ही डॉक्टरांनी जामीन अर्ज मागे घेतला आहे.



