Ahilyanagar-Manmad road : नगर : अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावरील (Ahilyanagar-Manmad road) देहरे येथे बस व दुचाकीचा अपघात (Accident) झाला होता. यात एका २० वर्षींय युवकाचा मृत्यू (Death) झाला होता. या प्रकरणी संतप्त नागरिकांनी आज (ता. ३०) सकाळपासूनच देहरे येथे देहरे, विळद, शिंगवे, नांदगाव ग्रामस्थांनी अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावर ठिय्या दिला. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
नक्की वाचा : महायुती फिस्कटली; शिवसेना शिंदे गट स्वबळावर लढवणार निवडणूक
भरधाव बसची दुचाकीला धडक
देहरे परिसरात शनिवारी (ता. २७) दुचाकीवरील रितेश चंद्रकांत खजिनदार (वय २०) व त्याच्या चुलत भावाचा अपघात झाला होता. हे दोघे शेतात निघाले होते. समोरून येणाऱ्या भरधाव बसने दुचाकीला धडक दिली. यात रितेश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे देहरे, विळद, शिंगवे नाईक, नांदगाव परिसरातील नागरिक संतप्त झाले. त्यांनी आज (ता. ३०) सकाळपासूनच अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावर ठिय्या मांडला. तसेच प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. या रस्त्यावर ५० पेक्षाही जास्त लोकांचे बळी गेले आहेत. आणखी किती बळी घेणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी प्रशासनाला विचारला. रितेश हा पोलीस पाटील चंद्रकांत खजिनदार यांचा एकुलता एक मुलगा आहे.

अवश्य वाचा: भंडारदरा परिसरात ‘थर्टी फर्स्ट डिसेंबर’ साजरा करताना नियम पाळा!
दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी (Ahilyanagar-Manmad road)
या आंदोलनात जालिंदर कदम, राजकुमार आघाव, संतोष काळे, विद्वल पटारे, श्रीहरी काळे, प्रकाश लांडगे, दत्ता खताळ, महेंद्र कोळपकर, मेघनाथ धनवटे आदी सहभागी झाली आहेत. विळद ते राहुरी रस्ता झाला पाहिजे, भुयारी मार्गाचे काम अपूर्ण आहे. हे काम त्वरित व्हावे, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.


