Ahilyanagar Municipal Corporation : अहिल्यानगर महापालिकेची कर वसुलीचा टक्का यंदा घटला

Ahilyanagar Municipal Corporation : अहिल्यानगर महापालिकेची कर वसुलीचा टक्का यंदा घटला

0
Ahilyanagar Municipal Corporation : अहिल्यानगर महापालिकेची कर वसुलीचा टक्का यंदा घटला
Ahilyanagar Municipal Corporation : अहिल्यानगर महापालिकेची कर वसुलीचा टक्का यंदा घटला

Ahilyanagar Municipal Corporation : नगर : अहिल्यानगर महापालिकेच्या (Ahilyanagar Municipal Corporation) मालमत्ता कर व पाणीपट्टी (Water Tax) वसुलीचा टक्का यंदाच्या आर्थिक वर्षात घसरला आहे. २०२५-२६ आर्थिक वर्षात ६८ हजार ६३८ करदात्यांनी कर भरला असून ७१ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. शास्तीमाफी (Penalty Waiver) योजनेत १५ हजार ६२९ करदात्यांनी लाभ घेऊन १७ कोटी रुपयांचा कर भरला आहे. शास्ती माफीची सवलत वगळता महापालिकेच्या तिजोरीत केवळ ६०.३५ कोटी रुपये जमा झाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ८ कोटी रुपयांचा वसुलीचा टक्का घसरला.

नक्की वाचा : शिर्डी जमीन व्यवहारात फसवणूक; खरात पती-पत्नीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

ऑनलाईन कर भरणाऱ्यांची संख्या वाढली

महापालिकेत गत वर्षी शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करून पूर्णमूल्यांकन करण्यात आले. त्यामुळे वाढीव मालमत्तानुसार मालमत्ताधारकांना कर लागू झाला. तर, पाणीपट्टीत वाढ केल्याने महापालिकेतच्या तिजोरीत भर पडणार होती. परंतु, यंदा महापालिकेची वसुली ८ टक्क्यांनी घसरली आहे.सप्टेंबर, ऑक्टोबर दरम्यान महापालिकेची निवडणूक झाल्याने सर्व वसुली कर्मचारी आणि अधिकारी महापालिका निवडणुकीच्या कामात गुंतले होते. त्याचा परिणाम वसुलीवर झाल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या कर वसुलीमध्ये वर्षभरात ऑनलाईन कर भरणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

व्यापक मोहीम राबवावी लागणार (Ahilyanagar Municipal Corporation)

वर्षभरात १७२६७ करदात्यांनी ऑनलाईन पद्धतीने कर भरला आहे. वर्षभरात ६८६३८ करदात्यांनी कर भरल्याने ७१.९६ कोटींच्या वसुलीची नोंद झाली. शास्तीमाफीमुळे १०.७४ कोटींची सवलत देण्यात आली. त्यामुळे ६०.३५ कोटी वसुली झाली आहे. दरम्यान, महापालिकेला आता वसुलीसाठी व्यापक मोहीम राबवावी लागणार आहे. त्यासाठी महापौर, उपमहापौर व आयुक्त यांनी संयुक्त रित्या वसुली मोहीम राबविणे आवश्यक आहे.

निधीची चणचण जाणवणार

महापालिकेने गेल्या महिन्यात १७३८ कोटींचे बजेट सादर केले. त्यात अनेक नव्याने कामे सुचविण्यात आली. मात्र, त्यासाठी महापालिकेकडे स्वहिस्सा भरण्यासाठी निधीची चणचण जाणवणार आहे. गेल्या आठवड्यात महापालिकेकडे कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी निधी नव्हता, त्यात वसुलीची कासव गती महापालिकेचा गाढा कसा पुढे नेणार असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

वर्षेनिहाय वसुली 
२०२१-२२ (५८.८२ कोटी)
२०२२-२३ (५७.५९ कोटी)
२०२३-२४ (५६.०९ कोटी)
२०२४-२५ (६७.८४ कोटी)
२०२५-२६ (६०.३५ कोटी)