Ahilyanagar Municipal Corporation : नगर: अहिल्यानगर महापालिकेची (Ahilyanagar Municipal Corporation) निवडणूक नुकतीच पार पडली असून या महापालिकेत ६८ नगरसेवक (Corporator) निवडूण आले आहेत. त्यापैकी फक्त आठच नगरसेवक हे उच्चशिक्षित (Highly Educated) असल्याचे त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून पुढे आले आहे. तर काही उमेदवार पहिली, दुसरी, तर काही आठवी, दहावी, बारावी, काही आयटीआय तर काही बीए, बीकॉम झाले आहेत.
नक्की वाचा: भारतीय सैन्य, वन विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने वाचविले १२ ट्रेकर्सचे जीव
आय लव्ह नगर ने घेतला आढावा
अहिल्यानगर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. तब्बल सात वर्ष आणि एक महिन्यानंतर ही निवडणूक पार पडली. सुमारे दोन वर्ष एक महिने महापालिकेत प्रशासक राज सुरू होते. आता प्रशासक राज आज संपुष्टात आला असून अहिल्यानगर महापालिकेत निवडून आलेले नगरसेवक किती उच्चशिक्षित आहेत याचा आढावा आय लव्ह नगर ने घेतला असता त्यामध्ये फक्त आठच नगरसेवक उच्चशिक्षित असल्याचे समोर आले आहे.
हे देखील वाचा: मुंबई महापौरपदाची निवड; बहुमत असूनही भाजप-शिंदे नाही तर ठाकरेंचा महापौर होणार?
हे आहेत उच्चशिक्षित नगरसेवक (Ahilyanagar Municipal Corporation)
अहिल्यानगर महापालिकेची ही निवडणूक विकासाच्या तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवली असली तरी राजकीय पक्षाने दिलेले उमेदवार यांचे शिक्षण किती झाले हे न पाहता अहिल्यानगरच्या जनतेने विकास कामे पाहून हे ६८ उमेदवार निवडून दिले आहेत. त्यापैकी प्रभाग एक मधून डॉ. सागर बोरुडे हे (M.B.B.S, DCH), प्रभाग तीन मधून ऋग्वेद गंधे (MBA, LLM, DIBL & CLI), गौरी बोरकर (M.Ed), प्रभाग पाच मधून हरप्रीत कौर गंभीर (M.Sc), प्रभाग सात मधून बाबासाहेब वाकळे (M.Sc), प्रभाग ८ मधून सुनीता भिंगारदिवे (M.Sc), प्रभाग ११ मधून गणेश कवडे ( M.A. B.Ed), प्रभाग १७ मधून मनोज कोतकर (M.A. B.Ed) हे उच्चशिक्षित नगरसेवक आहेत.



