
Ahilyanagar Municipal Corporation : नगर : अहिल्यानगर महानगरपालिकेचे (Ahilyanagar Municipal Corporation) २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचे तब्बल १७१० कोटी रुपयांचे मुळ अंदाजपत्रक दि. १७ मार्च २०२६ रोजी स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे (Subhash Londhe) यांच्याकडे आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी सादर केले. या अंदाजपत्रकातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याचा मानस स्पष्ट झाला आहे.
नक्की वाचा : ‘बैटल ऑफ गलवान’चा नवा अवतार; सलमान खानचा चित्रपट आता ‘मातृभूमी’ नावाने येणार

११६१ कोटी ४२ लाख रुपये खर्च अपेक्षित
अंदाजपत्रकानुसार महसुली उत्पन्न ४८१ कोटी ०४ लाख रुपये तर भांडवली जमा ११६१ कोटी ४२ लाख रुपये अपेक्षित आहे. महसुली उत्पन्नात संकलीत करापोटी १०३ कोटी ८० लाख, करावर आधारित उत्पन्न ८९ कोटी ७० लाख, जीएसटी अनुदान १५१ कोटी ९२ लाख, इतर अनुदान १७ कोटी २७ लाख, गाळा भाडे ३ कोटी ९३ लाख, पाणीपट्टी ३३ कोटी, मीटरद्वारे पाणीपुरवठा २० कोटी आणि इतर उत्पन्न ४२ कोटी ३९ लाख यांचा समावेश आहे. भांडवली कामांसाठी अनुदान, कर्ज व मनपा हिस्सा मिळून ११६१ कोटी ४२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहेत.
अवश्य वाचा : घायवाळच्या कानशिलात लागावणाऱ्या सागर मोहोळकरचा मृत्यू
भत्ते व मानधनावर १६१ कोटी ९० लाख खर्च अपेक्षीत (Ahilyanagar Municipal Corporation)
या आर्थिक वर्षात वेतन, भत्ते व मानधनावर १६१ कोटी ९० लाख, पेन्शन, सेवा उपदान इ. वर ७१ कोटी ५० लाख, पाणी पुरवठा विज बिल ४५ कोटी, स्ट्रीट लाईट विज बिल ८ कोटी, शिक्षण विभाग वेतन हिस्सा ६ कोटी ५० लाख, महिला व बाल कल्याण योजना २ कोटी ५५ लाख, अपंग पुनर्वसन योजना २ कोटी ५५ लाख, मागासवर्गीय कल्याणकारी योजना ८ कोटी ४१ लाख, मा. सदस्य मानधन ६३ लाख, औषधे व उपकरणे १ कोटी ७० लाख, मा. सदस्य प्रभाग स्वेच्छानिधी ९ कोटी ६२ लाख, कचरा संकलन व वाहतूक इ. वर २० कोटी, पाणी पुरवठा साहित्य खरेदी व दुरुस्ती १ कोटी २५ लाख, टँकरद्वारे पाणी पुरवठा व तुरटी, ब्लिचिंग पावडर खरेदी २ कोटी ७५ लाख, अशुध्द पाणी आकार ५ कोटी, अग्निशमन वाहने खरेदी ३ कोटी, नविन रस्ते १ कोटी ५० लाख, रस्ते दुरुस्ती १ कोटी ५० लाख, इमारत दुरुस्ती ७५ लाख, शहरातील ओढ नाले साफसफाई ५५ लाख, आपत्कालीन व्यवस्थापन ५० लाख, कोडवाड्यावरील खर्च १२ लाख, वृक्षारोपण तदनुषंगिक खर्च १ कोटी, हिवताप प्रतिबंधक योजना ६० लाख, कचरा डेपो सुधारणा व प्रकल्प उभारणी १ कोटी, मोकाट कुत्री व जनावरे बंदोबस्त इ. १ कोटी ४० लाख, मालमत्ता सर्वेक्षण १० कोटी, मृत जनावरे विल्हेवाट प्रकल्प ५५ लाख, पुतळे बसविणे १ कोटी, भविष्य निर्वाह निधी तूट १ कोटी, बेवारस प्रेत विल्हेवाट २५ लाख, उद्यान दुरुस्ती २० लाख यासह इतर बाबींबर खर्च अपेक्षीत आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
उत्पन्न वाढविण्यावर भर
शहर वासियांना चांगल्या दर्जाचे रस्ते, मुलभूत आरोग्य सेवा, स्ट्रीट लाईट, शुध्द व मुबलक पाणी, निरोगी आरोग्य या चांगल्या दर्जाच्या सेवा देण्यासाठी महानगरपालिका बांधिल आहे. शासनाकडून प्राप्त होणा-या विविध विकास कामांसाठीच्या निधीतील मुलभूत सुविधा विकास योजना, दलितेतर वस्ती सुधारणा योजना, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, अल्पसंख्यांक विकास निधी, १५ वा वित्त आयोग, सर्वासाठी घरे निधी, दलित वस्ती सुधारणा, आपत्ती सौमिकरण, पर्यटनासाठी पायाभूत सुविधा पुरविणे निधी, पाणी पुरवठा निधी, आमदार निधी, खासदार निधी, रस्ते सुरक्षा योजाना, शहर सौंदर्याकरण पारितोषिक, जिल्हा ग्रंथालय इमारत बांधणे, ई बस सेवा केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबडेकर सामाजित विकास योजना, इत्यादी मधील कामे पूर्णत्वास नेणे व नविन कामांसाठी शासन स्तरावर प्रयत्न करुन जास्तीस्त निधी मिळवून शहराचा चांगल्या प्रकारे विकास करणे. त्याचप्रमाणे शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करुन घरपट्टी आकारणी करुन उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
महसूल वाढविण्याचा प्रयत्न
त्याचप्रमाणे महानगरपालिकांच्या जागांचा विकास करुन त्या माध्यमातून महसूल वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शहरातील अपूर्ण अवस्थेतील योजना व विकास कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येऊन शहराचा विकास करणेसाठी महानगरपालिका कटिबध्द आहे, असे आयुक्त डांगे यांनी सांगितले. यावेळी आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर, मुख्यलेखाधिकारी तथा उपायुक्त मेहेर लहारे, उपायुक्त शहाजहान तडवी, लेखापरीक्षक गणेश लयचेट्टी, लेखा विभागाचे अनिल लोंढे आदींसह स्थायी समिती सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते.


