
Ahilyanagar Municipal Corporation : नगर : अहिल्यानगर महापालिकेत (Ahilyanagar Municipal Corporation) आज (ता. २७) अर्थसंकल्पीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बहुजन समाज पक्षाचे (Bahujan Samaj Party) नगरसेवक श्रीपाद छिंदम (Shripad Chhindam) हे महापालिका आयुक्तांना प्रश्न विचारत असताना इतर नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान प्रकरणी आक्षेप घेत छिंदम यांना महासभेतून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे आज महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा अर्थकारण ऐवजी राजकारणावरून गाजली.
अवश्य वाचा : संगमनेरमध्ये रामजन्मोत्सव भक्तिमय वातावरणात
१७३८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प
महापालिकेत आज (ता. २७) दुपारी १ वाजता अर्थसंकल्पीय सभा महापौर ज्योती गाडे यांनी आयोजित केली होती. या सभेत १७३८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावेळी उपमहापौर धनंजय जाधव, स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे, सर्व नगरसेवक व महापालिकेतील अधिकारी उपस्थित होते. या सभेत अहिल्यानगर शहरातील मोकाट कुत्रे, महापालिकेच्या रिकाम्या भुखंडावरील ताबेमारी, पिंपळगाव माळवी तलाव येथील जागेच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
महापालिकेत तणावाचे वातावरण (Ahilyanagar Municipal Corporation)
या चर्चेत श्रीपाद छिंदम हे मुद्दा मांडण्यासाठी उभे राहिले. त्याच वेळी नगरसेवक संपत मयूर बांगरे, अमोल येवले, प्रकाश भागानगरे, गणेश भोसले, सुरेश बनसोडे, विकी जगताप आदींनी छिंदम यांनी महाराष्ट्राचे अराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला आहे. त्यांना महासभेतून बाहेर काढा असे म्हणत त्यांच्या हातातील माईक हिसकावून घेतला. भागानगरे यांनी छिंदम यांच्या हातातून महापालिकेचे अंदाजपत्रक काढून घेतले. त्यानंतर छिंदम यांना सभागृहातून बाहेर काढण्यात आले. यावेळी काहीकाळ महापालिकेत तणावाचे वातावरण निर्माण झाले.
छिंदम यांनी गाठले पोलीस अधीक्षक कार्यालय
सभागृहाबाहेर पडताच छिंदम यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. तसेच उपस्थित पत्रकारांशी संवाद साधत गंभीर आरोप केले. ते म्हणाले, मी जनतेने निवडून दिलेला नगरसेवक आहे. लोकशाहीतून मला बोलण्याचा अधिकार आहे. माझ्यावर महापालिकेच्या सभागृहात हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. माझ्या जीवितास काही झाले तर त्याला आमदार संग्राम जगताप जबाबदार राहतील, असा आरोपही त्यांनी केला.


