
Ahilyanagar Municipal Corporation Election : नगर : अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Ahilyanagar Municipal Corporation Election) आज (ता. १५) मतदान (Voting) प्रक्रिया पार पडली. यात १७ प्रभागांत सुमारे ७२ टक्के टक्के मतदान झाले. उद्या (ता. १६) मतमोजणी (Vote Counting) प्रक्रिय होणार आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
नक्की वाचा: महामार्गाच्या कामाचे ग्रहण दूर व्हावे यासाठी राहू केतूच्या मंदिरात अभिषेक
दुपारनंतर मतदान केंद्रांवर लागल्या रांगा
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत आज (ता. १५) सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. थंडी असल्याने सकाळी दहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर मतदारांची संख्या कमी होती. मात्र, दुपारपासून मतदान केंद्रांवर मतदार मोठ्या संख्येत दिसू लागले. यात केडगाव मधील प्रभाग १७मध्ये एका महिला मतदार मतदान केंद्रावर पोहोचल्या असता त्यांना मतदान झाल्याचे कळविण्यात आले. त्यांच्या बोटाला शाई नसतानाही मतदान कसे झाले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
अवश्य वाचा : खुनाच्या जेरबंद गुन्ह्यातील संशयित आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
काही ठिकाणी वाद (Ahilyanagar Municipal Corporation Election)
प्रभाग ३मध्ये बोगस ओळखपत्रांच्या आधारे बोगस मतदान घडवून आणले जात असल्याचा आरोप काही उमेदवारांनी केला. त्यानुसार दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. काही ठिकाणी तुरळक वाद झाले. काही ठिकाणी पैसे घेऊन मतदान होत असल्याचा आरोप झाला.
उद्या (ता. १६) सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. ही मतमोजणी एमआयडीसीतील शासकीय गोदामात होईल. त्यासाठी या परिसरात आज रात्रीच मतदान केंद्रांवरून मतदान यंत्रे गोळा करण्यात आली आहेत. या मतमोजणी प्रक्रियेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणता उमेदवार विजयी होणार व कोणाची महापालिकेत सत्ता येणार हे उद्या दुपारी एक वाजेपर्यंत निश्चित होणे अपेक्षित आहे. या निवडणुकीत पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे ६३ जागांसाठी २८३ उमेदवारांचे भवितव्य उद्या कळणार आहे. यात १३९ स्त्री तर १४४ पुरुष मतदार आहेत.


