
Ahilyanagar Municipal Corporation Election : नगर : अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत (Ahilyanagar Municipal Corporation Election) प्रभाग दोन मध्ये युतीच्या उमेदवारांना मतदारांनी (Voter) कौल दिला आहे. या चारही उमेदवार स्वतः अथवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती या प्रभागातून माजी नगरसेवक (Corporator) राहिले आहेत. त्यांनाच पुन्हा जनतेने सेवेची संधी दिली आहे.
नक्की वाचा: महामार्गाच्या कामाचे ग्रहण दूर व्हावे यासाठी राहू केतूच्या मंदिरात अभिषेक
२०१८च्या निवडणुकीत हे होते नगरसेवक
या प्रभागात २०१८च्या निवडणुकीत काँग्रेसच्या रुपाली वारे, संध्या पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे विनित पाऊलबुधे व सुनील त्र्यंबके हे नगरसेवक होते. तर २०१३च्या निवडणुकीत भाजपचे महेश तवले नगरसेवक होते. २०२६च्या निवडणुकीसाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची युती पहायला मिळाली. यात राष्ट्रवादीच्या सुनील त्र्यंबके यांची सून रोशनी भोसले यांनी भाजपकडून, भाजपचे माजी नगरसेवक महेश तवले यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून, काँग्रेसच्या संध्या पवार यांनी अजित पवार गटाकडून तर काँग्रेसच्या रुपाली वारे यांचे पती निखील वारे यांनी भाजपकडून निवडणूक लढवली.
अवश्य वाचा : महाराष्ट्रातील 2 हजार 869 जागांपैकी अर्ध्यापेक्षा अधिक जागा महायुतीच्या झोळीत
कुटुंबाजवळ राखली सत्ता (Ahilyanagar Municipal Corporation Election)
निखील वारे हे विखे गटाचे निष्ठावान समजले जातात. त्यामुळे या गटात युतीने ताकद दाखवली. या प्रभागात युती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी प्रमुख लढत होती. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवारांचा एबी फॉर्म बाद झाल्याने या प्रभागात त्यांचे उमेदवार अपक्ष होते. या प्रभागात युतीच्या तीनही उमेदवारांनी विजय मिळवत कुटुंबाजवळ सत्ता राखली.


