Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगरमध्ये पाच उमेदवार बिनविरोध नगरसेवक; भाजपचे तीन तर राष्ट्रवादीचे दोन

Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगरमध्ये पाच उमेदवार बिनविरोध नगरसेवक; भाजपचे तीन तर राष्ट्रवादीचे दोन

0

Ahilyanagar Municipal Corporation Election : नगर : महापालिका निवडणुकीत (Ahilyanagar Municipal Corporation Election) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (Nationalist Congress Party (Ajit Pawar)) प्रभाग ८ ड मधून कुमार वाकळे व प्रभाग १४ अ मधून प्रकाश भागानगरे (Prakash Bhaganagare) बिनविरोध निवडून आल्यानंतर २ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाच्या (BJP) प्रभाग ७ व मधून पुष्पा अनिल बोरुडे, प्रभाग ६ व मधून सोनाबाई तायगा शिंदे व प्रभाग ६ ड मधून करण उदव कराळे हे ३ उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगरमध्ये पाच उमेदवार बिनविरोध नगरसेवक; भाजपचे तीन तर राष्ट्रवादीचे दोन
Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगरमध्ये पाच उमेदवार बिनविरोध नगरसेवक; भाजपचे तीन तर राष्ट्रवादीचे दोन

अवश्य वाचा: युवा सेना जिल्हाप्रमुख आकाश कातोरे व शहरप्रमुख महेश लोंढे यांची पक्षातून हकालपट्टी

या प्रभागातील उमेदवारांची बिनविरोध निवड

महापालिका निवडणूक भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युती करून लढवत आहेत. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप झाले असून भाजपा ३२ जागा लढवत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस ३४ जागा लढवत आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्या दिवशी १ जानेवारीला प्रभाग ८ ड या सर्वसाधारण जागेवर राष्ट्रवादीचे कुमार वाकळे व प्रभाग क्रमांक १४ अ या नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेवर प्रकाश भागानगरे बिनविरोध झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग ७ या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाच्या श्रद्धा रविंद्र वाकळे व अपक्ष कविता दीपक खेडकर यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या ठिकाणी भाजपाच्या पुष्पा अनिल बोरुडे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. प्रभाग ६ व या सर्वसाधारण महिला जागेसाठी समेदवारी अर्ज भरलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सविता विवेक गायकवाड, शिवसेना शिदे गटाच्या अवंती चेतन शिरसुल, अपक्ष निलिमा वसंत गायकवाड, शिला बाबासाहेब बारस्कर यांनी माघार घेतली. त्यामुळे तेथे भाजपच्या सोनाबाई शिंदे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या.

Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगरमध्ये पाच उमेदवार बिनविरोध नगरसेवक; भाजपचे तीन तर राष्ट्रवादीचे दोन
Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगरमध्ये पाच उमेदवार बिनविरोध नगरसेवक; भाजपचे तीन तर राष्ट्रवादीचे दोन

नक्की वाचा : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेचा मुख्य निवडणूक निरीक्षक यांच्याकडून आढावा

निवडणुकीपूर्वीच मिळविल्या ५ जागा (Ahilyanagar Municipal Corporation Election)

तसेच प्रभाग ६ ड या सर्वसाधारण जागेसाठी आम आदमी पार्टीचे भरत श्रीराम खाकाळ, अपक्ष महेंद्र मोहिनीराज गंधे, सोननाथ मुरलीधर चिलामणी, श्रीनिवास सुरेश बोज्जा, विशाल संजय शितोळे, अभिषेक विलास शिंदे, राहुल बापू शिंदे, योगेश नामदेव सोनवणे यांनी आपल उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या ठिकाणी भाजपाचे करण उदय कराळे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. भाजपा वा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युतीने निवडणुकीपूर्वीच ५ जागा मिळविल्या आहेत.