Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर निवडणुकीत २८३ उमेदवार निवडणूक रिंगणात; आजपासून प्रचाराचा धुराळा

Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर निवडणुकीत २८३ उमेदवार निवडणूक रिंगणात; आजपासून प्रचाराचा धुराळा

0
Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर निवडणुकीत २८३ उमेदवार निवडणूक रिंगणात; आजपासून प्रचाराचा धुराळा
Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर निवडणुकीत २८३ उमेदवार निवडणूक रिंगणात; आजपासून प्रचाराचा धुराळा

Ahilyanagar Municipal Corporation Election : नगर : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत (Ahilyanagar Municipal Corporation Election) अर्ज माघारी प्रक्रियेनंतर लढती निश्चित झालेल्या आहेत. भाजप (BJP), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट (Ajit Pawar – Nationalist Congress Party) यांची युती, महाविकास आघाडी व शिवसेना शिंदे गट अशी तिरंगी लढत हा निवडणुकीत पहायला मिळणार आहे. ६३ नगरसेवक पदासाठी २८३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

अवश्य वाचा: अहिल्यानगरमध्ये पाच उमेदवार बिनविरोध नगरसेवक; भाजपचे तीन तर राष्ट्रवादीचे दोन

पाच उमेदवार बिनविरोध नगरसेवक

उमेदवारी अर्ज छाननीची प्रक्रिया ३१ जानेवारीला तर अर्ज माघारीची प्रक्रिया १ व २ जानेवारीला पूर्ण झाली. अर्ज छाननी प्रक्रियेतून ४७७ उमेदवार वैध ठरले. त्यातील १९४ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे पाच उमेदवार बिनविरोध नगरसेवक झाले आहेत. यात भाजपचे तीन तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन उमेदवारांचा समावेश आहे.

नक्की वाचा : विखे–जगताप एक्स्प्रेस सुसाट; पाच नगरसेवक बिनविरोध

लक्षवेधी लढती (Ahilyanagar Municipal Corporation Election)

प्रभाग ४ ड मध्ये एआयएमआयएमचे समद खान विरुद्ध काँग्रेसचे शम्स खान

प्रभाग ९ अ मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे किरण दाभाडे, शिवसेना शिंदे गटाचे संजय शेंडगे व काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण

प्रभाग ९ ड मध्ये भाजपचे महेश लोंढे, शिवसेना शिंदे गटाचे सचिन शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गिरीश जाधव यांच्यातील लढत

प्रभाग १० ड मध्ये भाजपचे सागर मुर्तंडकर, शिवसेना शिंदे गटाचे सचिन जाधव, शिवसेना ठाकरे गटाचे दिलदार सिंग बीर यांच्यातील लढत

प्रभाग ११ ब मध्ये भाजपच्या दीप्ती गांधी, शिवसेनेच्या शिंदे गटाच्या सुनीता गेनप्पा व शिवसेना ठाकरे गटाच्या ताराबाई शिंदे यांच्यातील लढत

प्रभाग १२ ड मध्ये भाजपच्या शुभ्रा तांबोळी, शिवसेना शिंदे गटाचे दत्तात्रेय कावरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नज्जू पैलवान यांच्यातील लढत

प्रभाग १५ क मध्ये भाजपच्या माजी उपमहापौर गीतांजली काळे, शिवसेनेच्या शिंदे गटाच्या विद्या खैरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुरेखा खैरे यांच्यातील लढत

प्रभाग १५ ड मध्ये भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या पूत्र सुजय मोहिते व शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांच्यातील लढत