Ahilyanagar Municipal Corporation General Election : अहिल्यानगर महापालिकेसाठी ३४५ केंद्रांवर गुरुवारी मतदान

Ahilyanagar Municipal Corporation General Election : अहिल्यानगर महापालिकेसाठी ३४५ केंद्रांवर गुरुवारी मतदान

0
Ahilyanagar Municipal Corporation General Election : अहिल्यानगर महापालिकेसाठी ३४५ केंद्रांवर गुरुवारी मतदान
Ahilyanagar Municipal Corporation General Election : अहिल्यानगर महापालिकेसाठी ३४५ केंद्रांवर गुरुवारी मतदान

Ahilyanagar Municipal Corporation General Election : नगर : अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Ahilyanagar Municipal Corporation General Election) गुरुवारी (ता. १५) रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. शहरातील १७ प्रभागांमध्ये एकूण ३४५ मतदान केंद्रांवर (Polling Station) मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक मनुष्यबळ, साहित्य व सुरक्षा व्यवस्था सज्ज असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या (Municipal Administration) वतीने देण्यात आली आहे.

अवश्य वाचा : संक्रांत साजरी करता, मात्र आदला आणि नंतरचा दिवस का महत्वाचा आहे ? जाणून घ्या…

मतदानासाठी एक हजार ८०० कर्मचारी नियुक्त

महापालिका निवडणुकीसाठी आज (ता. १३) जाहीर प्रचाराचा शेवटा दिवस आहे. सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी अखेरच्या टप्प्यातील प्रचारावर जोर दिला आहे. विविध पक्षाच्या नेत्यांच्या सभा होत असून, रॅली व प्रत्यक्ष गाठीभेटीवर उमेदवारांनी भर दिला आहे. गुरूवारी मतदान होणार असल्याने प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. मतदानासाठी एकूण एक हजार ८०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लोकशाहीचा हा उत्सव यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी निर्भयपणे व उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही करण्यात येत आहे.

नक्की वाचा: निंबळकमधील दुकानातून १५ लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

सर्व १७ प्रभागांची एकाच वेळी मतमोजणी (Ahilyanagar Municipal Corporation General Election)

महापालिका निवडणुकीसाठी एकुण १७ प्रभाग असून सर्व १७ प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी केली जाणार आहे. प्रत्येक प्रभागासाठी टपाली मतदानासाठी १ टेबल, ईव्हीएम मतमोजणीसाठी तीन टेबल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे टपाली मतदानासाठी १७ टेबल व ईव्हीएमसाठी ५१ टेबल असे एकूण ६८ टेबलांवर मतमोजणी होणार आहे.


दरम्यान, मतदानानंतर सर्व ईव्हीएम मशीन एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर शुक्रवारी (ता. १६) जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. उमेदवार व त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधींना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी ओळखपत्र प्रदान करणार असून, ओळखपत्राशिवाय मतमोजणी केंद्र व परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच मतमोजणी केंद्रात मोबाईल, लॅपटॉप, आयपॅड नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र व अद्ययावत पत्रकार कक्ष स्थापन करण्यात आला असून, प्रसिद्धी अधिकारी नितीन ब्राह्मणे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.