Ahilyanagar Municipal Corporation Mayoral Election : अहिल्यानगर महापालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर

Ahilyanagar Municipal Corporation Mayoral Election : अहिल्यानगर महापालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर

0

Ahilyanagar Municipal Corporation Mayoral Election : नगर : राज्यातील अहिल्यानगरसह २९ महापालिकांची निवडणूक (Ahilyanagar Municipal Corporation Election) नुकतीच झाली. महापौर पदासाठी २२ जानेवारीला आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता महापौर व उपमहापौर निवडीचा (Ahilyanagar Municipal Corporation Mayoral Election) कार्यक्रमही निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार अहिल्यानगर महापालिकेच्या महापौर (Mayor), उपमहापौरांची निवड ३० अथवा ३१ जानेवारीला होणार आहे. नाशिक विभागीय आयुक्त याबाबतचा निर्णय घेणार आहेत.

नक्की वाचा: भाच्यानेच केला मामाचा खून; स्थानिक गुन्हे शाखेकडून १५ दिवसानंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल

महापौर व उपमहापौर निवडले जाणार

महापौर, उपमहापौर निवडीसाठी झालेल्या जाहीर कार्यक्रमानुसार मुंबई महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदांसाठीची निवडणूक ३० किंवा ३१ जानेवारीला होईल. याबाबतचा निर्णय महापालिकेचे नगरसचिव घेतील. उर्वरित सर्व २८ महापालिकांसाठी याच दिवशी महापौर व उपमहापौर निवडले जाणार आहे. या महापालिकांची तारीख व वेळ संबंधित विभागीय आयुक्त निश्चित करणार आहेत.

अवश्य वाचा: फडणवीस यांनी झापलं…तरी MIM शी भाजपचं सूत जुळलं…

२४ किंवा २५ जानेवारीला निवडीची तारीख निश्चित (Ahilyanagar Municipal Corporation Mayoral Election)

अहिल्यानगर सह या सर्व २९ महापालिकांसाठी महापौर आणि उपमहापौर निवडीसाठीचा प्रस्ताव नगर सचिवांनी २३ जानेवारीला संबंधित विभागीय आयुक्तांकडे सादर करायचा आहे. विभागीय आयुक्तांनी २४ किंवा २५ जानेवारीला या निवडीची तारीख निश्चित करून पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करायची. या पदांसाठी इच्छुक सदस्य महापालिका सचिवांकडे २७ ते २८ जानेवारी दरम्यान आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यानंतर ३० किंवा ३१ जानेवारी रोजी दोन्ही पदांसाठी निवडणूक होईल. महानगरपालिकांच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या पहिल्या बैठकी दरम्यान ही निवड प्रक्रिया पार पडेल असे या कार्यक्रमात म्हंटले आहे.