
नगर : अमेरिका,इस्राईल आणि इराण या देशांमध्ये सध्या सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजीचा तुटवडा जाणवत असल्याने केंद्र शासनाने अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना एलपीजीला पर्याय म्हणून प्रत्येक कुटुंबाला तीन लिटर रॉकेल देण्याचा निर्णय (Decision to provide three liters of kerosene) घेतला आहे. अहिल्यानगर (Ahilyanagar News) जिल्ह्यासाठी २०१६ किलोलिटर म्हणजेच (२ लाख १६ हजार लिटर) रॉकेल मंजूर (Kerosene Approved) झाले आहे आणि त्याच वाटप देखील लवकरच सुरु होणार आहे.
नक्की वाचा: भारतात लॉकडाऊन लागणार का ? नेमकं सत्य काय?
शिधापत्रिकाधारकांना केरोसीन मिळणार (Ahilyanagar News)
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने बुधवारी जिल्हानिहाय ठरवून दिलेल रॉकेलचे प्रमाण मंजूर केले आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांशिवाय उपलब्धतेनुसार इतर शिधापत्रिकाधारकांना देखील केरोसीन म्हणजेच रॉकेल मिळणार आहे. शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांना केरोसीन मिळवण्यासाठी ग्रामपंचायत रहिवासी दाखला सादर करावा लागणार आहे. तसेच स्थालांतरित मजुरांना केंद्र अथवा राज्य शासनाचे ओळखपत्र दाखवावे लागणार आहे.
अवश्य वाचा: मैत्रिणीलाच मागितली २० लाखाची खंडणी, श्रीगोंद्याच्या तरुणाला अटक
प्रति कुटुंब ३ लिटर प्रमाणे केरोसीन मिळणार (Ahilyanagar News)
शिधापत्रिका किंवा शिधापत्रिकाधारक नसलेल्या लाभार्थ्यांना रास्त भाव दुकानदार किंवा किरकोळ केरोसीन विक्रेत्यांकडून प्रति कुटुंब ३ लिटर प्रमाणे केरोसीन मिळणार आहे. एखाद्या गावात केरोसीन विक्रेता उपलब्ध नसेल तर त्याला शेजारच्या गावातून केरोसीन उपलब्ध करुन दिले जाईल. विक्रेत्यांना केरोसीन साठा व वितरणाच्या दैनंदिन नोंदी ठेवणे बंधनकारक आहे.तसेच केरोसीनची वाहतूक परवानाधारक वाहनातून करावी लागणार आहे. सध्या ग्रामीण भागात केरोसीन वितरण व्यवस्था कार्यान्वित नसल्याने तहसीलदारांना तालुकास्तर वितरण व्यवस्था, केरोसीनची आवश्यकता व मागणी तसेच दुकानदारांचा प्रतिसाद याबाबींचा विचार करुन गावनिहाय केरोसीन वाटपाचे नियोजन हे करावे लागणार आहे.
आता हे केरोसीन वितरण ते मार्च-एप्रिल महिन्यात करायचे असल्याने वाटपाच्या दिनांकापासून ४५ दिवसांत संपूर्ण उचल करावी लागणार आहे. न उचललेले केरोसीन पुढील महिन्यात मिळणार नाही, असे शासन आदेशात म्हटले आहे. केरोसीन वाहतूक दरात तसेच किरकोळ कमिशनमध्ये सुधारणा करण्याची बाब ही शासनस्तरावर विचाराधीन असल्याने केरोसीन दराबाबत स्वतंत्र आदेश येणार आहे. तसेच केरोसीनचा गैरवापर होऊ नये यावर नजर ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर एक संयुक्त निरीक्षक पथक तयार करण्यात येणार आहे. हे पथक केरोसीनची पेट्रोल-डिझेल मधील भेसळ रोखणार आहे. केरोसीनाची अनाधिकृत विक्री किंवा गैरवापर आढळल्यास अशा व्यक्तीवर त्वरित कारवाई करण्यात येणार आहे.


