Ahilyanagar News:अहिल्यानगर जिल्ह्याला दुसरे मंत्रिपद मिळणार का? राजकीय चर्चांना उधाण 

0
Ahilyanagar News:अहिल्यानगर जिल्ह्याला दुसरे मंत्रिपद मिळणार का? राजकीय चर्चांना उधाण 
Ahilyanagar News:अहिल्यानगर जिल्ह्याला दुसरे मंत्रिपद मिळणार का? राजकीय चर्चांना उधाण 

Ahilyanagar News: नाशिकच्या सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा (Resignation from the ministerial post) द्यावा लागला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात न्यायालयानं त्यांना २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिल्याने माणिकराव कोकाटे हे सगळ्या बाजूने अडचणीत सापडले. आधी मोबाईलवर रमी खेळतानाचा वाद आणि आता सदनिका घोटाळा प्रकरणात ते दोषी ठरले, मात्र आता माणिकराव कोकाटे यांच्याकडे असलेले क्रीडामंत्रीपद हे कोणाला मिळणार याकडेच सगळ्याचं लक्ष लागलं आहे. या क्रीडा मंत्रिपदासाठी अनेक नवे चर्चेत आहेत. त्यातील एक नाव आपल्या अहिल्यानगर (Ahilyanagar News)जिल्ह्यातील देखील आहे. ते कोणते हेच जाणून घेऊ…

नक्की वाचा:  उस्मान हादीच्या हत्येनंतर बांग्लादेशात हिंसाचार ;शरीफ उस्मान हादी नक्की कोण?  

क्रीडा मंत्री पदासाठी कोणती नावे चर्चेत ? (Ahilyanagar News)

माणिकराव कोकाटे यांचे खातं काढून घेतल्यानंतर सध्या ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. आता कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची निवड कधी होणार, ते खातं कोणाल मिळणार असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्याची नेमणूक जिल्हा परिषद निवडणुका संपल्यावरच होणार आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपेपर्यंत क्रीडा व अल्पसंख्याक खातं हे अजित पवार यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती आहे.

मात्र आता या मंत्रिपदाच्या शर्यतीत देखील अनेक नावे आहेत. तसेच हे मंत्रिपद देताना अजित पवारांकडून जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मंत्रीपदासाठी जे इच्छुक आहेत, त्यांच्यामध्ये सध्या माजी मंत्री धनंजय मुंडे, अनिल पाटील, संजय बनसोडे यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे माणिकराव कोकटेंच्या जागी जर मराठा समाजातील नव्या चेहऱ्याचा विचार केला तर अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप, प्रकाश सोळंखे आणि सुनील शेळके या तीन नावांचा सुद्धा विचार होऊ शकतो.

अवश्य वाचा: शेतकऱ्याचा मुलगा आयपीएल गाजवणार; मराठमोळा खेळाडू ओंकार तारमळे नेमका कोण ? 

संग्राम जगताप यांचं नाव चर्चेत का ? (Ahilyanagar News)

आता अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांचं नाव चर्चेत असण्याचे कारण म्हणजे आमदार संग्राम जगताप हे मागील तीन पंचवार्षिक सलग आमदार राहिलेले आहेत. तसेच तरुणपिढीचे नेतृत्व करणारा युवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात.सलग सत्तेत असल्याने त्यांना हे मंत्रिपद दिल जाऊ शकतं. त्यातच आमदार संग्राम जगताप हे अजित पवारांचे निकटवर्तीय  समजले जातात. तसेच त्यांनी सध्या घेतलेल्या प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांना भारतीय जनता पक्षाचा देखील पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. तसेच पुढील लोकसभा निवडणुकीसाठीही आमदार संग्राम जगताप यांच्याकडून राष्ट्रवादीला मोठी अपेक्षा असल्याने मंत्रिपदाची माळ त्यांच्याही गळ्यात पडण्याची शक्यता वर्तिविली जात आहे. जर असं झालं तर अहिल्यानगर जिल्ह्याकडे २ मंत्रीपदे येतील… महायुतीतील राजकीय गणिते पाहता अहिल्यानगरला दुसरे मंत्रिपद मिळते का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.